शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला एवढे पाणी हवे कशाला?

By admin | Updated: November 19, 2015 02:05 IST

गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा

मुंबई : गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, नऊ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. पिण्यासाठी एवढे पाणी मुबलक असल्याने उर्वरित पाणी जायकवाडीमध्ये सोडण्यात येऊ नये, अशी अंतरिम मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.संबंधित याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत, उच्च न्यायालयाने पाणीप्रश्नावरील याचिकांची सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. ‘जीएमआयडीसी’ने नाशिक-नगरच्या धरणांमधून जायकवाडीला १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी पिण्यासाठी आणि पिकांसाठी सोडण्यात येत आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. ‘जीएमआयडी’च्या निर्णयाला नाशिक-नगरकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवर अंतरिम दिलासा देताना, उच्च न्यायालयाने नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्यासाठी केवळ पिण्यापुरतेच पाणी सोडण्यात यावे, असा आदेश ‘जीएमआयडीसी’ला दिला.पिण्यापुरते पाणी सोडण्याचा आदेश असतानाही राज्य सरकार मराठवाड्याला १२.८४ टीएमसी पाणी सोडणार आहे. त्यात पिण्यासाठी आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. त्यामुळे राज्य सरकारला मराठवाड्याला पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, याचा हिशेब करून, तेवढेच पाणी सोडण्याचा आदेश द्यावा. उर्वरित ३. ८४ टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये सोडू नये, अशी मागणी करणारा अर्ज न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारपासूनच उच्च न्यायालयाला मूळ याचिकांवर अंतिम सुनावणी घेणे बंधनकारक होते. मात्र, याचिकाकर्ते अंतिम युक्तिवादासाठी तयार नसल्याने, खंडपीठाने त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम सुनावणीची तारीख पुढे ढकण्यासंदर्भातील आदेश घेऊन येण्यास सांगितले.