शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हापूसच्या नावाखाली विकल्या जाणा-या आंब्याला बसणार चाप, ‘कोकण हापूस’ला जीआय मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 21:55 IST

वैशिष्ट्यपूर्ण रंग, गंध आणि चव यामुळे जगभरात मागणी असलेल्या कोकणात पिकणा-या हापूस आंब्याला ‘जीआय’ (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळाले आहे.

- मेहरून नाकाडेरत्नागिरी : वैशिष्ट्यपूर्ण रंग, गंध आणि चव यामुळे जगभरात मागणी असलेल्या कोकणात पिकणा-या हापूस आंब्याला ‘जीआय’ (जिओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन मिळाले आहे. दहा वर्षांपासून होत असलेली ही मागणी न्यायिक प्रक्रियेत अडकली होती. हापूसचे मातृस्थान कोकण असल्याच्या मुद्द्यावर आता शिक्कामोर्तब झाल्यामुळे हापूसचा भाव वाढेल, हे निश्चित झाले आहे. देवगड किंवा रत्नागिरी असे स्वतंत्र मानांकन न करता ‘कोकण हापूस’ असे मानांकन देण्यात आल्यामुळे दोन्ही ठिकाणच्या आंबा उत्पादकांना ते फायदेशीर ठरणार आहे.देवगड तालुका आंबा उत्पादक संघ आणि केळशी आंबा उत्पादक संघ यांच्याबरोबरच दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून ही मागणी झाली होती. मात्र या मुद्द्याबाबत काही लोकांनी आक्षेप घेतल्यामुळे विद्यापीठाने २२ सप्टेंबर २००८ ला पाठविलेला प्रस्ताव न्यायिक प्रक्रियेत अडकला होता. अखेर न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता कंट्रोलर जनरल पेटंटस् डिझाइन, ट्रेडमार्क या भारत सरकारच्या नोंदणीकृत संस्थेकडून कोकण हापूसला जीआय प्रमाणपत्र देण्यात आले आहे.आतापर्यंत देशातील १३८ कृषी उत्पादनांना ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. कोकणातील काजू, कोकम व चिकू या तीन उत्पादनांचा समावेश होता. कोकणातील चौथे मानांकन प्राप्त उत्पादन हापूसचा मानांकन क्रमांक १३९वा आहे. हापूसला मानांकन मिळाल्याने हॉल मार्कप्रमाणे विशेष ‘जीआय’ चा लोगो तयार करण्यात येणार आहे. हा लोगो उत्पादनांवर लावण्यात आल्याने ‘जीआय’ उत्पादन कोणते हे ग्राहकांना तत्काळ कळेल आणि त्यामुळे त्याला तसा दरही मिळेल. कोकणातील काजू, कोकम आणि चिकू यांनाही याअगोदरच जीआय मानांकन मिळाले आहे.--------------------------‘जीआय’ मानांकनामुळे होणारे फायदे- कोकणच्या हापूसला जगभरात मिळणार स्वतंत्र ओळख- मानांकनामुळे (ब्रँडनेममुळे) हापूसला मिळणार चांगला भाव- हापूसच्या नावाखाली विकल्या जाणा-या परराज्यातील आंब्याला बसणार चाप