शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

वाढलेला ‘टक्का’ कोणाचा? राज्यात ६२.८८% मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 06:19 IST

औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, माढा, सांगली आणि सातारा या सहा ठिकाणी २०१४च्या तुलनेत मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा वा तोट्याचा यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज बांधणे सुरू झाले आहे.

- यदु जोशीमुंबई : राज्यात मंगळवारी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात १४ जागांसाठी सरासरी ६२.८८ मतदान झाले. औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, माढा, सांगली आणि सातारा या सहा ठिकाणी २०१४च्या तुलनेत मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा वा तोट्याचा यावरून वेगवेगळे राजकीय अंदाज बांधणे सुरू झाले आहे.औरंगाबादमध्ये काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यात जोरदार चौरंगी लढत झाली. त्यामुळे येथे मतदानाचा टक्का वाढलेला दिसतो. बारामतीत २.७१ टक्के मतदान वाढल्याने दोन्ही बाजूंनी मतदारांचा उत्साह गेल्या वेळेपेक्षा अधिक होता हे स्पष्ट होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात तेथे अटीतटीची लढत दिसते. साताऱ्यात उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) विरुद्ध नरेंद्र पाटील (शिवसेना) या औत्सुक्यपूर्ण लढतीने मतदानाचा टक्का ३.५८ ने वाढविला. सांगलीत संजयकाका पाटील (भाजप), विशाल पाटील (स्वाभिमानी) यांच्यातील थेट लढतीत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पाडळकर यांचेही आव्हान होते. या चुरशीमुळे मतदान वाढले असे मानले जात आहे. माढात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील संघर्षपूर्ण लढतीचे प्रतिबिंब मतदानातही उमटल्याचे दिसते. तेथेही मतदान वाढले. रायगडमध्ये दुहेरी लढत असूनही मतदान कमी झाले.अहमदनगरमध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यात जोरदार लढत असल्याचे वाढलेल्या टक्केवारीवरून दिसते. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेना, स्वाभिमान पक्ष व काँग्रेस अशी तिहेरी लढत असतानाही मतदान ३.८७ टक्क्यांनी कमी झाले. जळगाव, रावेर, जालना, पुणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर व हातकणंगलेमध्ये मतदानाचा टक्का घसरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी विरुद्ध शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात काटे की टक्कर असलेल्या हातकणंगलेमध्ये मतदानाचा टक्का गेल्या वेळपेक्षा २.७२ ने घसरला असला तरी ७०.७० टक्के मतदान प्रचंड चुरस दाखविते. कोल्हापुरात २.७२ टक्क्याने मतदान कमी झाले खरे, पण तिथेही सत्तरी गाठली गेली. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात घमासान लढाई आहे.भाजपकडून सातत्याने एक्झिट पोलआतापर्यंत झालेल्या तिन्ही टप्प्यांतील लढतींत नेमका कल कोणाकडे होता हे जाणून घेण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाकडून सातत्याने नामवंत संस्थांकडून एक्झिट पोल करवून घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई आहे; पण राजकीय पक्ष वा प्रसारमाध्यमे असा एक्झिट पोल त्यांच्या आकलनासाठी घेतात. भाजपने देशातील एका नामवंत कंपनीला हे काम दिले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सत्तेत असल्यानंतर विशिष्ट यंत्रणांकडून अहवाल घेता येतात. तसे ते सातत्याने घेण्याचे कामदेखील सुरू आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019