शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांच्याकडून शिकलो, त्यांच्याचपासून सुरूवात.. अमित राज ठाकरेची फेसबूकवर एन्ट्री

By admin | Updated: February 8, 2017 08:54 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित राज ठाकरेची फेसबूकवर अधिकृत एन्ट्री झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित राज ठाकरेची फेसबूकवर अधिकृतरित्या  एन्ट्री झाली आहे. काल रात्री अमित यांनी ' राज ' यांचे त्याने काढलेले चित्र आणि एक फेसबूक पोस्ट टाकत आपल्या अकाऊंटचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे यानिमित्ताने  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य याच्यानंतर आता अमितच्या रुपाने ठाकरे घराण्याच्या तिस-या पिढीचा नवा प्रतिनिधी सक्रिय राजकारणात उतरताना दिसेल अशीही चर्चा सुरू आहे. 
अमित यांच्या पेजला अवघ्या काही तासांतच २५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित ठाकरे यांनी फेसबुक सुरु करत राजकारणातच एंट्री केली असल्याचे बोलले जात आहे. ' गेले काही महिने मी माझ्या बाबांबरोबर खूप फिरत होतो. त्यावेळी मला माझ्या विचारसरणीचे खूप लोकं भेटत होते. त्यांना त्यांचे विचार माझ्यासमोर मांडायचे होते तसेच 'अमित ठाकरे' म्हणून माझे विचार समजून घ्यायला ते उत्सुक होते. पण इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लोकांशी संवाद साधायला खूप वेळ लागणार. त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला Facebook page चा पर्याय वापरतोय' अशी पोस्टही अमितने टाकली आहे.