शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

शरद पवारांना ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारे 'माणिकराव जाधव' आहेत कोण?

By महेश गलांडे | Updated: September 26, 2019 15:57 IST

माणिकराव जाधव हे गेल्या 25 वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचा लढा लढत आहेत.

महेश गलांडे

राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण तेवढ्यावर थांबणारे नाही. केंद्रीय दक्षता आयोगानेही (सीव्हीसी) शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि शिखर बँकेतील तत्कालीन संचालकांविरोधात चौकशी करण्याचे आदेश नाबार्डला दिल्याची माहिती आहे. शरद पवारांवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. निवडणुका आल्यानं भाजपा ईडीला हाताशी धरून ही कारवाई करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परंतु, शरद पवार ईडी चौकशीच्या फेऱ्यात ज्यांच्या तक्रारीमुळे आले, ते माणिकराव जाधव यांचं म्हणणं वेगळंच आहे. 

माणिकराव जाधव हे गेल्या 25 वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचा लढा लढत आहेत. राज्यात सन 1972-73 साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी, यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. हे त्यांचं पहिलं आंदोलन. त्याचा परिणाम म्हणून आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ते नाशिकच्या तुरुंगात होते.

शिक्षण : -  माणिकराव जाधव हे मूळचे लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील एका लहानशा गावातील रहिवासी आहेत. सध्या ते निलंगा येथे राहतात. त्यांचे शालेय शिक्षण निलंगा येथेच पूर्ण झाले असून महाविद्यालयीन शिक्षण लातूर, औरंगाबाद येथे पूर्ण केले. बीए पदवीधर शिक्षण घेतल्यानतर त्यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, कामगार आणि शेतकरी चळवळीशी जोडल्यामुळे चळवळीतच पूर्ण वेळ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे कायद्याच्या पदवीचे शिक्षण त्यांनी सोडून दिले. 

कामगार चळवळीशी संबंध अन् राजकारणात प्रवेश

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगल्यानंतर ते बाहेर आले. या काळात कामगार आणि चळवळीतील मित्रांशी त्यांचा संपर्क वाढला आणि तेव्हाच त्यांनी कामगार आणि शेतकरी चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतले. साखर कारखाने हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्र राज्य साखर कारखाना महासंघ फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून 1975 ते 2005 दरम्यान त्यांनी काम पाहिले. याच माध्यमातून त्यांचा राज्यातील साखर कारखानदारी, कामगार आणि शेतकऱ्यांशी संपर्क आला. 

राज्यातील साखर कारखाना कामगार आणि शेतकरी यांच्यातील संपर्कातील चळवळीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. या माध्यमातून जिल्हा परिदेच्या निवडणुकीत ते निवडून आले. 1993च्या किल्लारी भूकंपावेळी ते जिल्हा परिषद सदस्य आणि सभागृह विरोधी पक्षनेते होते. याच काळात, किल्लारीतील सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे यासाठी त्यांनी लढा दिला. त्याच दरम्यान, भूकंपग्रस्तांचा पुनर्वसन आणि किल्लारी कारखान्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काम केलं. यातून 3 वर्षे हा सहकारी साखर कारखाना चालवला. शेतकरी सहकारी साखर कारखाना, औसा. असे या कारखान्याचे नाव असून त्याचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील होते. 

जनता दलाचे आमदार माणिकराव जाधव यांनी 1995 साली जनता दलाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मी कुठल्याही पक्षाचा नेता नव्हतो, पण जनता दलाच्या आग्रहामुळे त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यावेळी, 40 हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झालो. विशेष म्हणजे, निवडणुकीसाठी एक रुपयाही खर्च केला नव्हता. किल्लारी भूकंपावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य, सभागृहात विरोधीपक्षनेते म्हणून केलेल्या कामाचा मला निवडणुकीत फायदा झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांचा मोठा पराभव करुन मी विधानसभा सभागृहात पोहोचलो, असं जाधव यांनी 'लोकमत'ला सांगितलं.

अंबाजोगाईचा कारखाना, परभणी जिल्ह्यातील पाथरीचा सहकारी साखर कारखानाही आम्ही काही वर्षे चालून दाखवल्याचं आणि शेतकऱ्यांना उत्तम भावही मिळवून दिल्याचं माणिकराव जाधव आवर्जून सांगतात. शेतकरी आणि कामगारांच्या भागिदारीने हे साखर कारखाने चालले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. 

राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील शरद पवारांचे नावाबद्दल माणिकराव जाधव अद्यापही ठाम आहेत. साखर कारखानदारी मोडून काढण्याचे काम पवारांनी केल्याचा दावा ते ठामपणे करतात. आम्ही गेल्या 20 वर्षांपासून कायदेशीर लढा लढत आहोत. राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे आम्ही कायदेशीर लढाई लढवत असल्याचं जाधव यांनी सांगितलं. आमच्या लढाईला यश आलं आणि 22 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 84 पानांचा निकाल दिला. त्यामध्ये 67 आणि 68 नंबरच्या पानावर शरद पवारांच्या नावाचा उल्लेख आहे. न्यायालयाने सर्वच पुरावे आणि दाखल्यांचा अभ्यास करूनच पवारांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपल्या निकालात दिल्याचे माणिकराव जाधव यांनी सांगितले. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यांनंतर 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे, असं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlaturलातूरMumbaiमुंबईAjit Pawarअजित पवार