शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू ?, 12 जिल्ह्यांना नाही सरकारमध्ये प्रतिनिधित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 06:36 IST

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केल्याने, आता कोणाला घरी बसावे लागणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केल्याने, आता कोणाला घरी बसावे लागणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या वा दुस-या आठवड्यात फेरबदलाची शक्यता आहे.विभागीय संतुलन पाहता, मुख्यमंत्री (नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन), वित्तमंत्री, सामाजिक न्याय, कृषी, ऊर्जा, उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती विदर्भाकडे आहेत. महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार व अन्न आणि नागरीपुरवठा सोडले, तर महत्त्वाची खाती पश्चिम महाराष्ट्राकडे नाहीत, तसेच संख्याबळही कमी आहे. हा राजकीय अनुशेष विस्तारात भरून काढला जाऊ शकतो. मराठवाड्यातील आठपैकी पाच जिल्ह्यांना प्रतिनिधित्वच नाही. हा अनुशेष सर्वाधिक आहे. एकाच वेळी विरोधी पक्ष व शिवसेनेशी सामना करीत, तिथे ताकद वाढविण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील मराठवाड्याचा टक्का वाढू शकतो. विदर्भातील एक-दोन मंत्र्यांना कामगिरीच्या आधारे वगळले जाऊ शकते. त्यात एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तसे झाल्यास विदर्भातून किमान दोन नवे चेहरे दिसू शकतील. मुंबईत विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यापैकी मेहतांवर संक्रांत येऊ शकते. मात्र, मुंबईला आणखी एक मंत्रिपद नक्की दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.पंकजा मुंडे व विद्या ठाकूर या दोनच महिला मंत्री आहेत. त्यातही ठाकूर यांना वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास नाशिक शहरातून महिला आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. या जिल्ह्यात भाजपाचा एकही मंत्री नाही.>घरी बसविणे सोपे नाहीआदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर निष्क्रियता व घोटाळ्याचे आरोप झाले. विनोद तावडे हेही काही प्रकरणात अडचणीत आले. प्रकाश मेहता, पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप झाले असले, तरी त्या सर्वांनाच घरी बसविणे सामाजिक वा इतर समीकरणांमुळे सोपे नाही. एक-दोघांना डच्चू देऊन इतरांची खाती बदलली जाऊ शकतात.>उद्धव ठाकरेंनंतर खा. पटोले राहुल गांधींनाही भेटणारभाजपाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकºयांच्या मृत्यूंची चौकशी संयुक्त संसदीय समितीने करावी, या पटोले यांच्या मागणीचे ठाकरे यांनी समर्थन केले. आपण लवकरच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. -वृत्त/२>एकनाथ खडसे यांच्या पुनरागमनाची शक्यता दिसत नाही. पुण्यातील जमीनप्रकरणी त्यांच्या चौकशीचा अहवाल अद्याप विधिमंडळात सादर होऊ शकलेला नाही. हे बघता क्लीन चिट न मिळताच ते मंत्रिमंडळात परततील, अशी चिन्हे नाहीत.>उपरेपणाची भावना दूर करणार?लोकसभा वा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१४ मध्ये अन्य पक्षांतून भाजपात आलेले जवळपास ३५ आमदार आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही मंत्रिपद नाही. त्यामुळे भाजपात येऊनही उपरेपणाची वागणूक दिली जात असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे त्यापैकी एक-दोन जणांना संधी दिली जाऊ शकते. तथापि, आघाडी सरकारमध्ये मंत्री वा आमदार म्हणून प्रतिमा डागाळली होती, अशांना स्थान दिले जाणार नाही.>यांना नाही प्रतिनिधित्वसामाजिकदृष्ट्या विचार करता, माळी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही. एकही मुस्लीम मंत्री नाही.>हे जिल्हे आहेत मंत्र्यांविनारत्नागिरी, रायगड, वाशिम, भंडारा, वर्धा, सातारा, नंदुरबार, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड या १२ जिल्ह्यांना भाजपा वा शिवसेनेने मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वच दिलेले नाही. त्यातील काही जिल्ह्यांना निश्चितपणे संधी मिळेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसे