शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"कोण आदित्य ठाकरे? तो केवळ एक आमदार; त्याची शेवटची धडपड सुरू आहे" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 11:48 IST

एकाच शहरात ठाकरे-शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

पुणे - एकनाथ शिंदे यांच्या बंडात शिवसेनेचे तब्बल ४० आमदार सहभागी झाले त्यामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र दिसून आले. शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले ते गद्दारच आहेत अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बंडखोरांवर निशाणा साधत आहेत. त्याचसोबत राज्यात ठिकठिकाणी निष्ठा यात्रा काढून बंडखोरांवर घणाघात करत आहेत. आज पुण्यातील कात्रज चौकात तानाजी सावंत यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर आदित्य ठाकरे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यावरून तानाजी सावंत यांनी टोला लगावला आहे. 

तानाजी सावंत म्हणाले की, हे शक्तिप्रदर्शन नव्हे तर शक्तीपात झाला आहे. शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे आली आहे. शिवसेना म्हणून एकही शिवसैनिक राहिला नाही. आदित्य ठाकरेंची शेवटची धडपड सुरू आहे. कोण आदित्य ठाकरे? काय संबंध? आदित्य ठाकरे हा एक आमदार आहे यापेक्षा फारसं महत्त्व देत नाही. आदित्य ठाकरे असो किंवा अन्य कुणी ज्यांनी सभा आयोजित केली असेल त्यावर मी लक्ष देत नाही असा टोला तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

आदित्य ठाकरे-एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावरएकाच शहरात ठाकरे-शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांची राज्यभरात निष्ठा यात्रा सुरू आहे. संध्याकाळी ते पुण्यात येतील. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रात सासवड येथे पहिली सभा होत आहे. या सभेला शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, सांगल्याचे आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित असतील अशी माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील कात्रज चौकात असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या घरी भेट देणार आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे कात्रज येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे