शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

इंद्राणीची पाहुणी कोण?

By admin | Updated: October 9, 2015 01:36 IST

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार इंद्राणी मुखर्जी बेशुद्ध पडण्यापूर्वी तिला भेटण्यासाठी आलेल्या तरुणीमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारागृहाच्या नोंदवहीत ओळख दडवून

- मनीषा म्हात्रे,  मुंबईशीना बोरा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार इंद्राणी मुखर्जी बेशुद्ध पडण्यापूर्वी तिला भेटण्यासाठी आलेल्या तरुणीमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारागृहाच्या नोंदवहीत ओळख दडवून या तरुणीने इंद्राणीला भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी तिला अडवून माघारी पाठवले. या संशयास्पद तरुणीच्या भेटीने शीना बोरा हत्याकांडाला नवीन वळण येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.भायखळा येथील कारागृहात रवानगी केल्यापासून इंद्राणीला भेटण्यासाठी कोणीही आले नव्हते. त्यातही २४ सप्टेंबरपासून फक्त तिच्या वकील गुंजन मंगला यांनी पाचवेळा तिची भेट घेतली होती. यातच १९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेली इंद्राणी २ आॅक्टोबर रोजी कोठडीत बेशुद्ध पडली. या प्रकरणी तिचा जबाब घेतला. या जबाबाची पडताळणी होत असताना, इंद्राणी बेशुद्ध पडण्यापूर्वी तिला एका तरुणीने भेटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती कारागृहाचे पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रुग्णालयाकडून देण्यात आलेली औषधे कर्मचारी स्वत:च्या हाताने इंद्राणीला देत आहेत. तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तुरुंगातील मानसोपचार तज्ज्ञ वाढवले आहेत. सीबीआयकडून येत्या दोन दिवसांत तिचा जबाब नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंद्राणीने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले असल्याने, तिच्या अटकेनंतर हे प्रकरण जाणून घेण्यासाठी ब्रिटिश दुतावासाचे अधिकारी तुरुंगात येणार आहेत. ‘ते’ पत्र पोलिसांनीही वाचलेइंद्राणीने कोठडीत गेल्यापासून पीटर मुखर्जीला चार पत्रे लिहिली आहेत. त्यापैकी दोन पत्रांचे उत्तर तिला मिळाले होते. हे पत्र कारागृहातील पोलिसांनीही वाचले असून, या माहितीचा समावेशही अहवालात करण्यात येईल.सीसीटीव्ही महत्त्वपूर्ण दुवाकोठडीत इंद्राणी बेशुद्ध पडल्यानंतर कोठडीबाहेर असलेल्या पॅसेजमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये इंद्राणी बेशुद्धावस्थेनंतरचा घटनाक्रम कैद झाला आहे. कारागृहाकडून सादर करण्यात येणारा अहवालात हे फुटेज महत्त्वपूर्ण ठरणार आहे.महिन्याला दोन हजारांची मनी आॅर्डर इंद्राणीला घरचे जेवण देण्यास मनाई असल्याने इतरांप्रमाणे तिलादेखील कारागृहातील जेवण देण्यात येत आहे. कारागृहाच्या उपहारगहातून बिस्लेरी बॉटल्स अथवा इतर खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी तिला दर महिन्याला २ हजारांची मनी आॅर्डर येत आहे.अहवाल प्रतीक्षाकारागृहातील कैदी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. इंद्राणीच्या घटनेनंतर काहीजण रजेवर गेले होते. त्यांचेही जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. काही वैद्यकीय अहवाल येणे बाकी असल्याने संपूर्ण अहवाल तयार होण्यास आणखी १ ते २ दिवस लागण्याची शक्यता आहे. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर अहवाल गृहविभागाकडे सादर करण्यात येणार आहे.