शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

डोंबिवलत आढळला पांढरा कावळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 17:24 IST

कुणालाही विचारलं काळ्या रंगाचा पक्षी कोणता तर आपण सहज कावळा असं सांगू. पण तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिला आहेत का? हो, पांढऱ्या रंगाचा कावळा.

डोंबिवली: कुणालाही विचारलं काळ्या रंगाचा पक्षी कोणता तर आपण सहज कावळा असं सांगू. पण तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिला आहेत का? हो, पांढऱ्या रंगाचा कावळा. असाच एक पांढऱ्या रंगाचा कावळा मंगळवारी दुपारी पूर्वेकडील पेंडसे नगर परिसरात वावरताना  प्लांट अँड अनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) संस्थेला आलेल्या हेल्पलाईन वर समजले असून पक्षीमित्र तो कुठे असेल यावर निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळी गेले, आणि त्यांनी कावळ्याला अन्य कावळ्यांच्या मारापासून वाचवलं.

याबाबत पॉजचे संचालक निलेश भणगे म्हणाले की, पेंडसे नगर मध्ये महेश वीला, आंध्र बँक जवळ पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता तेव्हा हितेश शहा ह्यांना तो कावळा आढळून आला. त्यांनी पॉज हेल्पलाईन ला फोन केला आणि निलेशने लगेच जाऊन त्याला बाकी काळ्या कावळ्याच्या मारातून वाचवलं. शहा यांच्या घराजवळ येणाऱ्या पाखरांमध्ये  एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले.

कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केलं, तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण चोच आणि डोळे हे कावळ्या सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली. त्यांनी त्या कावळ्याला वाचवलं असून मुरबाड येथील त्यांच्या संस्थेच्या हॉस्पिटलला निगराणी खाली ठेवले असल्याचे सांगितले.

अशा प्रकारचा कावळा क्वचितच आढळतो. खरंतर, पांढरा कावळा ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे. पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंगद्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी - जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते, असे भणगे यांनी सांगितले.  

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली