शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

तोंडात साखर कधी पडणार?, पालकमंत्री नियुक्त्या : अजित पवार गटाचे मंत्री दोन महिन्यांपासून ताटकळले

By दीपक भातुसे | Updated: August 29, 2023 08:23 IST

काही जिल्ह्यांवरून महायुतीत वाद असल्याने या नियुक्त्या रखडल्या असल्याची चर्चा आहे.

- दीपक भातुसे

मुंबई : भाजप आणि शिंदे गटात अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर महायुती अस्तित्वात आली. समन्वय समितीची स्थापनाही करण्यात झाले आहे. मात्र अजित पवारांसह त्यांच्या गटातील नऊ जणांचा मंत्रिमंडळात सहभाग होऊन दोन महिने होत आले तरी या नऊ मंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळालेले नाही. काही जिल्ह्यांवरून महायुतीत वाद असल्याने या नियुक्त्या रखडल्या असल्याची चर्चा आहे.

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर तात्पुरती जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, ध्वजारोहणापुरते हे मंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर मात्र पालकमंत्री म्हणून कायमस्वरुपी नियुक्त्या या मंत्र्यांना मिळालेल्या नसल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येही नाराजी आहे.

मागील दोन महिन्यात समन्वय समितीची एकच बैठक पार पडली आहे. या बैठकीतही विशेष चर्चा झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि महायुतीतील इतर विषयांवर निर्णय घेण्यासाठी या आठवड्यात समन्वय समितीची बैठक व्हावी, असा आग्रह राष्ट्रवादीने धरला असल्याचे अजित पवार गटातील एका नेत्याने सांगितले.

तीनही पक्षांच्या नेत्यांचे दौरे, सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम यामुळे बेैठकीसाठी वेळ मिळत नव्हता. मात्र येणाऱ्या तीन-चार दिवसात समन्वय समितीची बैठक होईल. या बैठकीत महामंडळ, त्याच्या समित्या आणि विधिमंडळ समित्यांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा होईल. पालकमंत्री हा विषय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरील आहे. - प्रसाद लाड, अध्यक्ष, महायुती समन्वय समिती

पालकमंत्रिपदाचा निर्णय हा तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री  त्यासाठी सक्षम आहेत. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

‘तुझ्या तोंडात साखर पडो...’सोमवारी पुण्यात एका पत्रकाराने (‘लोकमत’च्या नव्हे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होणार, अशी चर्चा आहे...’ असा प्रश्न केला असता ‘तुझ्या तोंडात साखर पडो...’ असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले आणि हंशा पिकला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सत्तेत सहभागी होताना दहा मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. नऊ जणांना मंत्रिपद मिळाले आहे, तर एक मंत्रिपद शिल्लक आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालय