शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

बारामती जिल्हा होणार कधी?

By admin | Updated: June 19, 2014 23:35 IST

ठाणो जिल्ह्याचे विभाजन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

महेंद्र कांबळे ल्ल बारामती
ठाणो जिल्ह्याचे विभाजन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याच अनुषंगाने भौगोलिकदृष्टय़ा विस्ताराने मोठय़ा असलेल्या नगर व पुणो जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे अस्तित्वात कधी येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: पुणो जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे पुणो जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्हा अस्तित्वात येणार, याची चर्चा मागील 2क् ते 22 वर्षापासून आहे. परंतु, यावर शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 
साधारणत: 1991 पासून पुणो व नगर जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पुणो जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरसह सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा समावेश करून बारामती जिल्हा निर्मिती करण्याच्या हालचाली 1991 पासून सुरू आहेत. परंतु, त्यावर अंतिम निर्णय होत नाही. 
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या 12 डिसेंबर 2क्12 मध्ये या तारखेचे औचित्य साधून बारामती जिल्हा घोषित करण्याच्या हालचाली होत्या. मात्र, त्या वेळी निर्णय झाला नाही. सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला. पुणो जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मूळ प्रस्ताव त्यापूर्वी होता.  त्यामध्ये बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, कर्जत या तालुक्यांचा समावेश केला होता. त्यानंतर पुन्हा दौंडचा समावेश केला. त्याचबरोबर बारामती जिल्ह्याची निर्मिती झालीच, तर पुरंदर तालुक्याचादेखील  यामध्ये समावेश करावा, अशा हालचाली सुरू झाल्या. जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व कार्यालय बारामतीत सुरू करण्यात आले आहेत. तसेच, ज्या तालुक्यांचा बारामती जिल्ह्यामध्ये समावेश होण्याचा प्रस्ताव आहे. त्यांचे अंतर साधारणत: 5क् ते 6क् किलोमीटर इतके आहे. त्यामुळे महसुली कामासह अन्य महत्त्वाच्या कामांना गती येईल, नागरिकांचे प्रश्न सुटतील.  
 
4पुणो, अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्टय़ा विस्तारलेल्या या जिल्ह्यांचे विभाजन करणोदेखील महत्त्वाचे आहे. पुण्यापासून इंदापूरचे शेवटचे गाव 17क् किलोमीटर आहे. त्यामुळे कोणत्याही महसुली अथवा अन्य कामांसाठी जाण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रस होतो. त्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण, माळशिरस, कर्जत तालुक्यांना बारामती मध्यवर्ती ठिकाण आहे.
 
4जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे सर्व शासकीय कार्यालये बारामतीमध्ये सुरू झाली आहेत. त्यासाठी नवीन मध्यवर्ती इमारत उभारण्यात आली आहे. महावितरण कंपनीचे परिमंडल कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अतिरिक्त सत्रन्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये बारामतीमध्ये आहेत. त्याबरोबर आरटीओ, कृषी, आरोग्य आदी विभागीय कार्यालयांचा कारभार बारामतीतून सुरू आहे.
 
4 पुणो, नगर जिल्ह्याचेदेखील विभाजन होण्याच्या हालचालींना वेग येईल. त्यानुसार ‘बारामती जिल्हा’ अस्तित्वात येण्याची चर्चा पुन्हा वाढली आहे. मात्र, बारामती जिल्ह्यात समावेश करण्यासाठी माळशिरस, फलटण, पुरंदरच्या राजकीय मंडळींचा विरोध आहे, असे सांगितले जात आहे.  परंतु, या तालुक्यांना बारामती जिल्ह्याची निर्मिती झाल्यास फायदाच होणार आहे.