शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

आंबेजोगाई जिल्हा केव्हा होणार?

By admin | Updated: June 25, 2016 04:06 IST

आम्ही २५ वर्षांपासून मागणी करीत आहोत. आंबेजोगाई जिल्हा कधी बनणार, असा थेट सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने केला. तेव्हा काय दृश्य असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीआम्ही २५ वर्षांपासून मागणी करीत आहोत. आंबेजोगाई जिल्हा कधी बनणार, असा थेट सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने केला. तेव्हा काय दृश्य असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. लोकमतमधील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या ४५ विद्यार्थ्यांनी दिल्ली सफरीत राजनाथ सिंह व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांनीही या विद्यार्थ्याचे वय विचारात घेत हसत हसत प्रतिप्रश्न विचारला, २५ वर्षांपासून? तू २५ वर्षांपासून ही मागणी कशी काय करू शकतो? त्यावर मुलाने उत्तर दिले, की माझ्या आधीपासून लोक ही मागणी करीत आहेत. तेव्हा राजनाथ सिंह यांना हसू आवरले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी याबाबत चर्चा करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.लोकमतमधील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या ४५ विद्यार्थ्यांना लोकमतच्या व्यवस्थापनाने हवाई सफर घडविली. त्यात महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व जिल्ह्यांमधील शाळकरी मुलांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी मुंबईहून ही मुले दिल्लीला पोहोचली. एका विद्यार्थ्याने लातूरमधील पाणीटंचाईकडे लक्ष वेधत या शहराचा दौरा करण्याची विनंती केली असता राजनाथ सिंह म्हणाले, की आता लातूरमध्ये चांगला पाऊस पडत आहे. पाण्याची समस्या सोडविली जाईल. या छोटेखानी भेटीत गृहमंत्र्यांनी सर्व मुलांना एकेक पार्कर पेन भेट दिला. याप्रसंगी लोकमतचे व्हाइस प्रेसिडेंट (वितरण) वसंत आवारे, भारत माने (कोल्हापूर), देवीदास वैद्य (अहमदनगर), शैलेंद्र राजपूत (जळगाव), प्रशांत अरक (औरंगाबाद), संजय गुल्हाने (नागपूर), शीलेश शर्मा, नबीन सिन्हा, प्रमोद गवळी, प्रवीण भागवत, अजित तिवारी उपस्थित होते.खूप अभ्यास करा, चांगले राहा. स्वत: महान बनत देशाला महान बनवा, असा संदेश राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘लोकमत’चा हा उपक्रम अतिशय चांगला असून, लोकमत वृत्तपत्र समूह सर्वांना परिचित आहे. खा. विजय दर्डा आमचे परमस्नेही आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी नमूद केले.प्रभूंनी जागवल्या आठवणीरेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आपल्या बालवयातल्या आठवणींसह मुलांसमोर भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. पाठोपाठ विद्यार्थ्यांनी मुंबईच्या लोकलपासून रेल्वेसंबंधी विचारलेल्या रोखठोक प्रश्नांना त्यांनी मनमोकळी आणि दिलखुलास उत्तरेही दिली. देशाच्या राजधानीत क्वचितच जमणारी ही अनोखी मैफील उत्तरोत्तर रंगतच गेली. रेल्वेमंत्र्यांनी जवळपास तासभर मुलांशी संवाद साधला. त्याचबरोबर लोकमतने आयोजित केलेल्या हवाई सफर उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.