शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

२५ टक्के रिक्त जागा केव्हा भरणार ?

By admin | Updated: February 26, 2015 02:57 IST

परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सुरू केलेल्या ‘दलालमुक्त परिवहन कार्यालये’ अभियानाला आरटीओ कर्मचा-यांनी पाठिंबा दिला आहे

मुंबई : परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी सुरू केलेल्या ‘दलालमुक्त परिवहन कार्यालये’ अभियानाला आरटीओ कर्मचा-यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र कर्मचा-यांकडून कामाची अपेक्षा करताना त्यांची सुरक्षा आणि सुमारे २५ टक्के रिक्त पदे भरण्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.५१ परिवहन कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या अभियानाला पाठिंबा असून सर्वसामान्य नागरिकांना सुविधा पुरवण्यास कर्मचारी समर्थ असल्याचा दावा संघटनेचे सरचिटणीस बाबाजी हांडे यांनी केला आहे. हांडे यांनी सांगितले की, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही शासनाने भूमिका स्पष्ट करायला हवी. काहीच दिवसांपूर्वी ताडदेव आरटीओसह राज्यातील काही आरटीओंमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाणीची प्रकरणे घडली होती. त्या वेळी संघटनेने राज्यभर काम बंद आंदोलन पुकारले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, याबाबत शासनाला विचारणा करणार आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेंद्र सरतापे म्हणाले, की लायसन्स वितरण, वाहनांची नोंदणी आरटीओमध्ये चालते. रिक्त पदे भरल्यास अतिरिक्त कामासाठी कोणत्याही दलालाची गरज नाही. सध्या लिपिकवर्गीय पदांची २ हजार १०१ पदे मंजूर केलेली आहेत. मात्र त्यातील ५४० म्हणजेच सुमारे २५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. शिवाय २००७ सालापासून वाहन प्रणालीअंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्डच्या रूपात देण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले होते. मात्र ३१ डिसेंबर २०१४ रोजी कंत्राट संपल्याने राज्यात काम करणाऱ्या ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ताण शासकीय कर्मचाऱ्यांवर पडला आहे. चतुर्थ श्रेणी कामगारांबाबतही तीच अवस्था आहे. सध्या ४२७ मंजूर पदांपैकी १७२ पदे रिक्त आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे १९८४ साली मंजूर केलेल्या या पदांमध्ये एकाही पदाची वाढ अद्याप करण्यात आलेली नाही.