शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील जलपर्णी हटणार तरी कधी?

By admin | Updated: June 9, 2016 01:26 IST

नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला

चाकण : गेल्या अनेक महिन्यांपासून इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली असून, नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला आहे.पुणे -नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथील भीमा नदीच्या पात्रात व चिंबळी, मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जलपर्णी केव्हा काढणार, असा प्रश्न भरतमहाराज यांच्यासह खेड तालुक्यातील वारकरी व स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.याकरिता प्रसिद्धी माध्यमांनी अनेकदा आवाजही उठविला होता. त्यामुळे महापालिकेने फक्त एक ते दोन वेळा जलपर्णी काढण्यासाठी अ‍ॅक्वेटिकवीर हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे ही जलपर्णी अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने तिच्यापासून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. हिरवेगार क्रिकेटचे मैदान दिसणारी ही जलपर्णी त्वरित हटवावी. या मागणीवर सभापती विलास कातोरे, चिंबळीचे उपसरपंच हेमंत जैद, अमोल जैद, मोईचे माजी सरपंच जीवन येळवंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, विकास येळवंडे व येथील नागरिक ठाम आहेत.>राजगुरुनगर, मोशी, चिखली, मोई, निघोजे, कुरुळी, चिंबळी, केळगाव, डुडूळगाव, गोलेगाव, मरकळ आदी ठिकाणी असलेल्या नदीपात्रामधील जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही जलपर्णी तातडीने काढावी व त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी थोरातमहाराज यांनी केली आहे.