शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’च्या आराखड्याला शासनाची मंजुरी कधी?

By admin | Updated: May 17, 2016 03:57 IST

नैना परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपवून ४० महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- नैना परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपवून ४० महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु अद्याप पहिल्या टप्प्यातील २३ गावांच्या विकास आराखड्यास शासनाची मंजुरी मिळविता आलेली नाही. याचा परिणाम विकासावर होवू लागला असून बांधकाम व्यावसायिकांसह या परिसरात घरे घेण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचेही नुकसान होऊ लागले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परवडणारी घरे बांधणे विकासकालाही परवडत नाहीत. यामुळे हजारो सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये परवडणाऱ्या घरांसाठी नैना परिसर हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. परंतु लालफितशाही कारभारामुळे येथील विकास अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. शासनाने १० जानेवारी २०१३ मध्ये नैना परिसराच्या नियोजनाची जबाबदारी सिडकोवर सोपविली. यापूर्वी नवी मुंबई, औरंगाबाद व इतर ठिकाणी शहर वसविण्याचा अनुभव असल्याने सिडको येथील विकासाला गती देईल असे अपेक्षित होते. परंतु तीन वर्षे ४ महिने पूर्ण झाल्यानंतरही फक्त २९ प्रकल्पांना बांधकाम परवानगी देता आली आहे. या गतीने विकास सुरू झाला तर २३ गावांमधील ३६८३ हेक्टर जमिनीचा विकास कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडकोने सर्व प्रथम २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. १३ आॅगस्ट २०१४ मध्ये प्रारूप अंतरिम विकास योजना तयार करून ती प्रसिद्ध केली व नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या. ११ सप्टेंबरपर्यंत सूचना पाठविणे अपेक्षित होते, पण जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या सूचना देता याव्यात यासाठी १० आॅक्टोबरपर्यंत कालावधी वाढविण्यात आला. तब्बल ३९४६ हरकती व सूचना सिडकोकडे आल्या. सूचना व हरकतींवर सुनावणी घेवून प्रारूप आराखडा शासनाकडे पाठविला. यानंतर शासनाच्या सूचनानंतर बदल करून अंतिम आराखडा नोव्हेंबर २०१५ ला शासनाकडे पाठविला आहे. नैनाच्या अंतिम विकास आराखड्याला सहा महिन्यानंतरही मंजुरी मिळालेली नाही. शासनाने मंजुरी दिली नसल्याने या परिसरातील बांधकामांना महानगर विभाग नगरनियोजन कायदा १९६६ अन्वये परवानगी द्यावी लागत आहे. नैनाची जबाबदारी सिडकोवर सोपविल्यापासून ३ वर्षे ४ महिन्यामध्ये विकास आराखडा मंजूर होत नसेल तर प्रत्यक्ष विकास कामे कधी सुरू होणार.नियमांवर बोट ठेवून सिडको परवानगी देत नसल्याने अनेकांनी परवानगी मिळेल या आशेवर बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली असून त्यांची फसवणूक होवू लागली आहे. विकास आराखडा मंजूर होण्यास अजून किती दिवस लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. >सरकारी यंत्रणेचा फटकानैना परिसराचा योग्यप्रकारे विकास करण्यासाठी शासनाने सिडकोकडे जबाबदारी दिली आहे. सिडकोने २७० पैकी पहिल्या टप्प्यात २३ गावांचा विकास करण्याचे निश्चित केले. याविषयी विकास आराखडा तयार करण्यामध्ये सिडकोला जवळपास ३ वर्षे कालावधी लागला. सहा महिन्यापूर्वी अंतिम विकास आराखडा शासनाकडे पाठविला परंतु अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सरकारी यंत्रणा अत्यंत धीम्या गतीने काम करत असल्याने त्याचा परिणाम विकासावर होत आहे. बिल्डरांविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नैना परिसरातील व्यावसायिकांकडे चुकीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. याविषयी व्यावसाय्ािक नाराजी व्यक्त करत आहेत. नियमांचे पालन झालेच पाहिजे. परंतु शासनाने व सिडकोने विकास आराखडा, बांधकाम परवानगी, पायाभूत सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. तीन वर्षात विकास आराखडाच मंजूर झाला नाही. या अनागोंदी कारभाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व दोष बिल्डरांच्या माथी मारून सिडको प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत असल्याविषयी नाराजी व्यक्त होत आहे.