शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी मुंबईत केव्हा येतात, त्याचीच वाट पाहतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 05:35 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा सध्या सुरु आहेत. गिरगावसह भांडुप आणि मुलुंड येथील सभांत भाजपावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा सध्या सुरु आहेत. गिरगावसह भांडुप आणि मुलुंड येथील सभांत भाजपावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सोमवारी चांदिवली येथील सभेत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई मोदींची सभा कधी होतेय, याची आपण वाट पाहत असल्याचे ते म्हणाले. त्या सभेनंतर मुंबई शिवसेनेचा होणारा विजय मला पाहायचाय, असे म्हणत त्यांनी भाजपाला जोरदार आव्हान दिले. आता भाजपा उद्धव यांना काय उत्तर देणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चांदिवलीत विशाल समुदायाला संबोधताना म्हणाले उद्धव म्हणाले, गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, मुंबईत शिवसेना राहणार नाही, पण शिवसेना आहे तिथेच आहे, उलट ती अधिक फोफावलीय. प्रचारासाठी धावून येणारे कोण आणि मुंबईकरांसाठी धावून येणारे कोण, याचा विचार करा. मुंबईकरांना शिवसेना पाहिजे भाडोत्री माणसे नकोत. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले मात्र अद्याप वीटही लागलेली नाही. हुतात्मा स्मारकाजवळ शपथ घ्यायची असेल तर ती संयुक्त महाराष्ट्राची शपथ घ्या, पारदर्शकतेची कसली घेता? असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. तीर्थप्रसाद म्हणून मुंबई मिळालेली नाही, त्यासाठी लढा द्यावा लागला. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले. मुंबईसाठी ही आमची तिसरी-चौथी पिढी कार्यरत आहे, असे म्हणत उद्धव यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणाची शपथ घ्या, असे आवाहन शिवसैनिकांना केले. महापालिका आपण जिंकणारच आहोत त्यात मला काही शंका नाही, असा विश्वास व्यक्त करत उद्धव यांनी राज्य सरकारसाठी शिवसेनेचा टेकू तुम्हाला लागतो, तरी मुंबई महापालिका गिळायला का निघालात, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे थेट आव्हानही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)