शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसचे चाक निखळले; सुमारे ७० प्रवासी थोडक्यात बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 12:33 IST

मानेगाव परिसरात प्रवाशांनी अनुभवला थरार

जळगाव जामोद: धावत्या एसटी बसचे चाक निखळून पडल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव परिसरात घडली. सुदैवानी बस नियंत्रणात आल्याने सुमारे ७० प्रवासी यातून थोडक्यात बचावले. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रवाशांनी हा थरार अनुभवला.

शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता जळगाव जामोद आगाराची बस क्रमांक एम.एच. ०७ सी ९४९८ जळगाव जामोद येथून बुलडाण्यासाठी निघाली. सध्या जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता प्रचंड खराब झाला आहे. दरम्यान ७० प्रवाशी निघालेल्या बसचे डाव्या बाजूचे मागील चाक अचानक निखळून पडले. त्यामुळे आतील प्रवाशांना मोठा झटका बसला. चालकाने प्रसंगावधान राखून लगेच एसटी बस बाजूला उभी केली. यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे दुसरे चाकही निखळून पडण्याच्या अवस्थेत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कदाचित दुसरे चाक निखळून पडले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती.

निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर!एसटी बसचा प्रवास सुरक्षित समजल्या जातो, त्यामुळे अनेकजण विश्वास ठेवून एसटी बसनेच प्रवास करतात. मात्र आगारातून निघालेली बस काही अंतरावरच दुर्घटनाग्रस्त होते. यावरून आगाराचे बसेसवर काही नियंतत्रण नसल्याचे दिसून येते. अनेक एसटी बसेस भंगार झाल्या असून हा एकप्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळच आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालून दोषी कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी अपघातग्रस्त बसने प्रवास करणारे शशांक दाते यांच्यासह प्रवाशांनी केली. 

टॅग्स :state transportएसटी