वसई : वालीव गावातील वीज पुरवठा गेल्या ४० तासापासून खंडीत झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप खदखदतो आहे. वीज पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाल्याने शुक्र वार पासून बत्तीगुल झाली आहे. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात कोणत्याच हालचाली केल्या गेल्या नसल्याने ही वेळ ओढावली आहे. गुरु वार पासून वसई तालुक्यात जोरदार सुरु झालेल्या पावसाने वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार उघडा पाडला. वसई पूर्वेतील वालीव गावाला धुमाळनगर व मांडवकरपाडा येथे असलेल्या दोन ट्रान्सफार्मरवरून विद्युत पुरवठा केला जातो. त्यातील मांडवकरपाडा येथे नदी किनारी असलेल्या ट्रान्सफार्मरचा स्टॅण्ड सरकल्याने तो शुक्र वारी दुपारी फेल झाला तर धुमाळनगरचा ट्रान्सफार्मर देखील अचानक नादुरु स्त झाल्याने वालीव गावचा वीज पुरवठा खंडीत झाला. हे दोन्ही ट्रान्सफार्मर तातडीने दुरु स्त करु न वीज पुरवठा सुरु करणे हे वीज कंपनीचे कर्तव्य असतानाही वीज कंपनीने नादुरुस्त ट्रान्सफार्मरकडे दुर्लक्ष केले. परिणामी वालीव गाव शुक्र वार पासून आज रविवार सायंकाळ पर्यंत म्हणजेच तब्बल ४० तास अंधारात आहे. (वार्ताहर)काही दिवसापूर्वी वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात संतप्त नागरीकांनी नालासोपाऱ्यात रास्तारोको केला होता. दरम्यान, आज दुपारपासून वीज कंपनीने ट्रान्सफार्मर शिफ्टिंगचे काम हाती घेतले गेले असल्याचे सांगण्यात आले.
वालीव ४० तास अंधारात
By admin | Updated: June 27, 2016 02:49 IST