शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लोकप्रतिनिधी गप्प का?

By admin | Updated: July 30, 2014 01:25 IST

झामरेने लुटले, जोशीने ओरबरडले, आता वासनकर लुटत असताना नागपुरातील लोकप्रतिनिधी गप्प का, कुणीच या ठगबाजांविरोधात आवाज का उचलत नाही, एकही राजकीय पक्ष रस्त्यावर येऊन

झामरे, जोशी, वासनकर लुटताहेत : गुंतवणूकदारांचा वाली नाही नागपूर : झामरेने लुटले, जोशीने ओरबरडले, आता वासनकर लुटत असताना नागपुरातील लोकप्रतिनिधी गप्प का, कुणीच या ठगबाजांविरोधात आवाज का उचलत नाही, एकही राजकीय पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन का करीत नाहीत, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या अन् आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही प्रतिक्रिया देणारे नेते नागपुरातील या लुबाडणुकीवर का बोलत नाहीत, असा सवाल नागपूरकर जनतेने उपस्थित केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यानंतर वासनकरला अटक केली. जवळपास ३ हजार गुंतवणूकदारांपैकी केवळ २० जणांनी तक्रार नोंदविली आहे. नाशिक येथील केबीसीच्या १० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर गुंतवणूकदारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राजकीय नेत्यांनीही त्यांना साथ दिली. तेसुद्धा आंदोलकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरले. या घोटाळ्याचा सवाल मुंबईतील खासदाराने लोकसभेत विचारला. पण नागपुरातील कोट्यवधींची रक्कम लुटून नेणाऱ्या फसव्या कंपन्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. त्यामुळेच लोकांचा नेत्यांवरील विश्वास उडाला आहे. फसव्या कंपन्यांच्या संचालकांशी बड्या नेत्यांचे हितसंबंध तर नाही ना? पक्षाच्या कार्यक्रमांसाठी, निवडणुकांसाठी यांना हे ठगबाज ‘फंड’ तर देत नाहीत ना, किंवा या ठगबाजांना संरक्षण देण्याची हमी तर नेत्यांनी घेतली नाही ना, अशा एक ना अनेक प्रश्नांनी नागरिकांच्या मनात घर केले आहे. बोललो तर ‘साहेब’ काय म्हणतील ? पीडित गुंतवणूकदारांच्या विरोधात बोललो तर ‘साहेब’ काय म्हणतील, अशी भीती सर्वच पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. नागपूरकांना झामरे, जोशी, वासनकर लुबाडतो तेव्हा लोकप्रतिनिधी गप्प बसतात. त्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्तेही गप्प राहणेच पसंत करतात. नागपुरात आतापर्यंत झालेल्या आर्थिक घोटाळ्यात पीडित गुंतवणूकदारांच्या बाजूने कुणी नेता वा कार्यकर्ता रस्त्यावर आला नाही. नेत्यांनी पुढे येऊन संघर्ष करावा, अशी भावना पीडित गुंतवणूकदारांमध्ये आहे. सामाजिक संघटनाची चुप्पीइराक-इराण प्रश्नावर प्रतिक्रिया देणाऱ्या संघटनांनी आर्थिक घोटाळ्यावर चुप्पी साधली आहे. कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यात कोणत्याही संघटनांनी प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा पीडितांच्या मदतीसाठी त्यांनी हात पुढे केलेला नाही. संघटनांची प्रतिक्रिया केवळ प्रसिद्धीसाठी असते. राजकीय नेत्यांसारखेच त्यांचेही ठगबाजांशी हितसंबंध असल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. लोकमतचे आवाहनसर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि वेगवेगळे आमिष दाखवून आर्थिक लूट करणारे प्रमोद अग्रवाल, प्रवीण व वर्षा झामरे, हरिभाऊ मंचलवार, समीर व पल्लवी जोशी, प्रशांत वासनकर, राजेश जोशी यांच्यासारखेच अनेक ठगबाज शहरातील गल्लीबोळात अजूनही फसवणुकीचा व्यवसाय करीतच आहेत. जनमाणसाचे डोळे उघडण्यासाठी लोकमतने मोहीम सुरू केली आहे. दामदुपटीचे आमिष दाखविणाऱ्या ठगबाजांच्या विरोधात नागरिकांनी पुराव्यांसह ९९२२९२८१०९, ९८५०९५७७८७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.दोन वर्षात दामदुप्पट शक्य नाहीराष्ट्रीयकृत बँका नऊ वर्षात दामदुप्पट देतात. दोन वर्षांत दामदुप्पट देणाऱ्या कंपन्यांचे गणित समजण्यापलीकडे आहे. त्यांना लोकांचे पैसे द्यायचेच नसतात. ठेवीदारांचा ओघ बंद झाल्यानंतर त्या कंपन्या लोकांना व्याज सोडा साधी मुद्दल देणेही टाळतात. वार्षिक ६० किंवा ७० टक्के व्याजदराच्या योजनांपासून लोकांनी दूर राहावे, असे अर्थतज्ज्ञांचे आवाहन आहे.