शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:35 IST

Maharashtra Politics: सत्ताधारी पक्षाच्या 'बोलघेवडे' आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची प्रतिमा मलिन होईल, अशी वक्तव्ये टाळण्याचे आवाहन वारंवार केले. तरीही मंत्री काही केल्या ऐकेनात.

Maharashtra Politics: काही मंत्र्यांचे बेशिस्त वर्तन आणि बेछूट विधाने यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. आता झाले ते खूप झाले, यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. खुलासाही न घेता कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांना दिला. परंतु, यानंतरही मंत्री करत असलेल्या विधानांमुळे वाद निर्माण होत असल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. 

बेडरुम व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. एका कार्यक्रमात बोलताना निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते? असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचा मास्टर क्लास घेऊनही मंत्री वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत.

काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’

मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आणि सत्ताधारी पक्षाच्या 'बोलघेवडे' आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची प्रतिमा मलिन होईल, अशी वक्तव्ये टाळण्याचे आवाहन वारंवार केले. तरीही मंत्री काही केल्या ऐकेनात. आ. संजय गायकवाड यांची कॅन्टीनवाल्याशी 'बॉक्सिंग', मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील व्हिडीओ, माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडीओ अशी प्रकरणे उजेडात आली. याउपरही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 'आपले काय चाललेय? पैसा काय आपल्या बापाचा आहे? सरकारचा आहे,' असे वादग्रस्त वक्तव्य करून 'हम नही सुधरेंगे' हाच संदेश दिला का? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, यापुढे बेताल वागले, बोलले तर थेट कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. मंत्रिमंडळ बैठकीत अजेंड्यावरील विषयांवर निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांना बाहेर पाठवले. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न होते. २० मिनिटे त्यांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, वादग्रस्त विधाने व कृती आता अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ही अखेरची संधी समजा. यापुढे कोणाचा खुलासाही घेणार नाही. 

 

टॅग्स :MahayutiमहायुतीState Governmentराज्य सरकारSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाटShiv Senaशिवसेना