शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

‘राज्य सरकारचं काम काय... शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’

By admin | Updated: June 5, 2017 00:54 IST

शासनाच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. ५) जेजुरी व पंचक्रोशी बंदचे आवाहन किसान मोर्चा जेजुरी व पंचक्रोशीने केले आहे

जेजुरी : शासनाच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. ५) जेजुरी व पंचक्रोशी बंदचे आवाहन किसान मोर्चा जेजुरी व पंचक्रोशीने केले आहे. आज सकाळी ११ वाजता किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जेजुरी येथील शिवाजी चौकात दुधाचा टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर सोडून दिले. किसान मोर्चाच्या वतीने जेजुरी व पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गावांनी बंद पाळण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. याबाबतचे निवेदन जेजुरी पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भाजीबाजार व जेजुरी शहरात फेरी काढून बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. तसेच या वेळी कार्यकर्त्यांनी जेजुरी येथील शिवाजी चौकातून पुण्याकडे जाणारा दिगंबर मिल्कचा दुधाचा टँकर अडवून त्यातील काही दूध रस्त्यावर सोडून दिले. किसान मोर्चाच्या बैठकीला माणिक झेंडे पाटील, संदीप जगताप, व्यंकटराव गरुड, हनुमंत काळाने, मुरलीधर काळाने, महादेव शेंडकर, सुकुमार भामे, अभिजित जगताप, संतोष उबाळे, रुपेश इंदलकर, तारीफ पानसरे, विठ्ठल सोनवणे, ज्ञानोबा जाधव आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.फोटो मेल केले आहेत ................जेजुरीत शेतकऱ्यांची बैठक. दुधाचा टँकर अडवून दूध ओतून देताना.>इंदापुरात आठवडेबाजार बंद लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी रविवारी शहरातील रविवारचा आठवडेबाजार, भाजीमंडई बंद ठेवण्यात आली होती. माळवाडी नंबर दोनच्या युवा शेतकऱ्यांनी शहरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध व शेतीमाल ओतून दिला.इंदापूरमधील आठवडेबाजार तालुक्यातील मोठ्या बाजारांमध्ये मोडतो. उजनी पाणलोटक्षेत्र, निमगाव केतकी, बिजवडीच्या तरकारी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीस येतो. हजारो रुपयांची उलाढाल होते. हा आठवडेबाजार बंद ठेवण्याचे आवाहन दि. २ जूनला शेतकरी संघटनेने केले होते. आज सकाळी मोजकेच शेतकरी विक्रीसाठी शेतमाल घेऊन आले. तेवढ्यात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुलाबराव फलफले, किरण बोरा, हरिदास पवार, सुहास दिवसे, दत्तू पवार, विजय हजारे, अभिजित काळे, पांचा भोसले, सचिन पवार, खाक्या काळे आदी तेथे आले. त्यांनी बाजार बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद दिला.>आठवडेबाजार भरलेच नाहीत...आळेफाटा कांदा बाजार भरलाच नाहीआळेफाटा : आळेफाटा उपबाजारात कांदा विक्रीस न आणता संप सुरूच ठेवला. यामुळे उपबाजारात शुकशुकाट होता. तसेच परिसरातील दूध संकलन केंद्रेही चौथ्या दिवशी बंदच होती. रविवारच्या आळेफाटा उपबाजारात शेतकरीवर्गाने कांदा विक्रीस न आणल्याने तेथेही शुकशुकाट होता. दुपारच्या दरम्यान चौकात आजही आळेफाटा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला़उरुळी कांचन शेतकरी कृती समितीची गांधीगिरी उरुळी कांचन :उरुळी कांचन येथील आठवडे बाजारामध्ये शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना गांधीगिरी करत गुलाबपुष्प देऊन शेतकऱ्यांच्या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उरुळी कांचन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले. या वेळी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लक्ष्मण कांचन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अमित कांचन, गणपत कड, दत्ता तुपे, देविदास कांचन, मनसे शहरप्रमुख विजय मुरकुटे, प्रसाद कांचन यांनी व्यापाऱ्यांना गांधीगिरीने गुलाबपुष्प देऊन संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत मंचरला बाजार बंदमंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील प्रसिद्ध असलेला रविवारचा बाजार बंद ठेवून या शेतकरी संपास मंचर ग्रामस्थांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. मंचर येथे रविवारी भरणारा आठवडेबाजार हा तालुक्यात खूपच प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी, व्यापारी आपला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात घेऊन येत असतात. प्रचंड मोठ्या प्रमाणावर या बाजारात आर्थिक उलाढाली होतात. मंचर ग्रामस्थांच्या या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद देत बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांच्या संपास सक्रिय पाठिंबा दर्शविला. बाजार बंद असल्याने नेहमीच गजबजाट असलेल्या या परिसरात आज पूर्णपणे शुकशुकाट जाणवत होता.बंदोबस्तात शिक्रापूरचा बाजारशिक्रापूर : शिक्रापूर येथे दर रविवारी भरविला जाणारा आठवडेबाजार शेतकरी संपामुळे बंद ठेवण्यात आला होता; परंतु किरकोळ व्यापारी येथे बाजारात आले व बंद असलेला आठवडेबाजार सकाळी दहानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी आजच्या बाजाराकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. प्रत्येक रविवारी सकाळी सात वाजता सुरू होत असलेल्या या बाजारामध्ये आज किंचित लोक व व्यापारी दिसून येत होते. परंतु हा बाजार बंद असल्याचे अनेकांनी सांगितल्याने बाजाराकडे जास्त कुणी फिरकले नाही. यानंतर तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून शिक्रापूर पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यानंतर दुपारनंतर बाजार काहीसा सुरळीतपणे सुरू झाला. आठवडेबाजार आज बंदमुळे व्यापारी गेले परतकेडगाव : शेतकरी संपाला प्रतिसाद म्हणुन खुटबाव येथील रविवारी होणारा आठवडे बाजार ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे बंद ठेवला. आज सकाळी ७ च्या सुमारास व्यापारी बाजारमैदानात दाखल झाले तेव्हा ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांना आठवडेबाजार आज बंद राहणार असल्याचे सांगितले. सदर सुचना मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी परत माघारी जाणे पसंद केले. ग्रामस्थांनी सर्व व्यापायार्साठी चहापान केले. यावेळी सरपंच शिवाजी थोरात,तंटामुक्ती अध्यक्ष दिगांबर थोरात,नानासाहेब थोरात, वाल्मिक थोरात, रामभाऊ थोरात,अशोक थोरात, एकनाथ थोरात, भाऊसाहेब शितकल, मोहन चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते....सणसरचा आठवडेबाजार बंदसध्या सुुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सणसर (ता. इंदापूर) येथील आठवडेबाजार बंद ठेवण्यात आला. त्यामुळे येथील बाजार मैदान ओस पडले होते. ग्रामपंचायतीने यापूर्वीच आठवडेबाजार बंद ठेवणार असल्याचे जाहीर केल्याने विक्रेते आज इकडे फिरकले नाहीत.