शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय केले? - हायकोर्ट

By admin | Updated: July 7, 2017 04:46 IST

स्कूलबस व शाळा यांमध्ये करार नसेल तर शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कशी निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्कूलबस व शाळा यांमध्ये करार नसेल तर शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कशी निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी काय पावले उचललेली आहेत, याची माहिती देण्यास सांगितले आहे. स्कूलबस व विद्यार्थ्यांची ने-आण करणारी अन्य वाहने केंद्र सरकारच्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली काळजी घेत नसल्याचा आरोप ‘पीटीए’ने केला आहे. ‘काही स्कूलबस व अन्य वाहनांनी शाळांबरोबर ‘कॉमन स्टॅण्डर्ड अ‍ॅग्रिमेंट’ केलेले नाही. करारानुसार, पालकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसचालकाने किंवा मालकाने योग्य ती काळजी घेतली की नाही, हे पाहण्याची जबाबदारी शाळांची आहे. मात्र हा करार केला जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे,’ असा युक्तिवाद पीटीएच्या वकील रमा सुब्रमण्यम यांनी केला. गेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी शाळा व पालकांनी मुलांना शाळेत नेण्यासाठी व आणण्यासाठी नेमलेले वाहन यांमध्ये करार असणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते. ‘शाळा आणि स्कूलबस किंवा अन्य वाहनांमध्ये करार नसल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा कशा निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे,’ असे न्यायालयाने नमूद केले.निर्णय अयोग्य"राज्य सरकारने १२ आसनक्षमता असलेल्या ११,९२२ वाहनांना स्कूलबसचा परवाना दिल्याची माहिती दिली. त्यावर सुब्रमण्यम यांनी आक्षेप घेतला. ‘केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार १४ किंवा त्याहून अधिक आसन क्षमता असलेल्या वाहनांनाच ‘स्कूलबस’चा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आहे,’ असे सुब्रमण्यम यांनी न्यायालयाला सांगितले.