शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

इमारत कोसळण्याचे नेमके कारण काय?

By admin | Updated: August 6, 2015 01:34 IST

नौपाडा, बी केबिन परिसरातील कृष्ण निवास इमारत धोकादायक अथवा अतिधोकादायक यादीत नसतानाही का पडली, असा पेच आता ठाणे महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.

ठाणे : नौपाडा, बी केबिन परिसरातील कृष्ण निवास इमारत धोकादायक अथवा अतिधोकादायक यादीत नसतानाही का पडली, असा पेच आता ठाणे महापालिकेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता यामागील सत्य बाहेर येण्यासाठी त्यांनी व्हीजेटीआयची मदत घेण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात व्हीजेटीआयला पत्रव्यवहार केला जाणार असून इमारत दुर्घटनेमागचे गूढ उकलण्याचे पालिकेने ठरविले आहे. तसेच या दुघर्टनेची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्तांनी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. ही इमारत कोसळून १२ जण मृत्युमुखी पडले असून ७ जण जखमी झाले आहेत. १९६३ मधील ही इमारत ५५ वर्षे जुनी असली तरी ती धोकादायक अथवा अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. त्यामुळे ती का पडली, याची चर्चा सध्या ठाण्यात सुरू झाली आहे. त्यामुळेच याचे चिंतन बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी इतर अधिकाऱ्यांबरोबर केले. या वेळी त्यांनी शहरात असलेल्या अतिधोकादायक इमारती खाली करण्यासंदर्भात पुन्हा एकदा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून धोकादायक इमारतींनाही नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच व्हीजेटीआयकडून अहवाल मागविण्यासोबतच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि इमारत का पडली, हे सत्य जाणून घेण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली असून यामध्ये अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि शहर विकास विभागाचे उपनगर अभियंता राजन खांडपेकर यांचा समावेश आहे. त्यानुसार, या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचे धोरण निश्चित केले जाणार आहे. ठाणे आणि परिसरात इमारती कोसळून वर्षभरात जवळपास दीडशेहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यातील अनेक इमारती या धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या आहेत. इमारती धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रि येत भ्रष्टाचार असून यात लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक व पालिका प्रशासन यांची अभद्र युती असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच इमारत दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नौपाडा येथे मंगळवारी झालेल्या इमारत दुर्घटनेच्या ठिकाणाला त्यांनी बुधवारी भेट दिली तसेच जखमींचीही विचारपूस केली. कृष्ण निवास ही इमारत धोकादायक नसताना कशी पडली, ठाण्यातील धोकादायक असलेल्या अनेक इमारतींच्या रहिवाशांनी इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यासाठी मागणी केली असताना त्या इमारती धोकादायक म्हणून जाहीर न करता ज्या धोकादायक नाहीत, अशा इमारतींना धोकादायक घोषित करून त्या पाडण्याचा प्रकार ठाण्यात घडत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली अनेक धोकादायक नसलेल्या इमारती धोकादायक म्हणून ठरविल्या जात आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या काम करणाऱ्यांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला हवे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनीदेखील या इमारत दुर्घटना प्रकारास पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप या वेळी केला. पालिका प्रशासन, शिवसेना आणि राज्यातील भाजपा सरकार एका दिवसात देवा कॉर्पोराचे अनधिकृत मजले अधिकृत करण्यासाठी जो नियम लावला, तोच नियम ठाणेकरांसाठी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुंबई, नवी मुंबई या शहरांतील नादुरुस्त इमारतींसाठी दुरुस्ती महामंडळ स्थापन करण्याची परवानगी दिलेली असताना अशी परवानगी ठाण्याला का मिळत नाही, असा प्रश्नदेखील मुंडे यांनी उपस्थित केला. इमारती दुरुस्त झाल्या तर बांधकाम व्यावसायिकांना धंदा मिळणार नाही, म्हणून अशा महामंडळाला परवानगी दिली जात नाही की काय, असा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचे महामंडळ होण्यासाठी व धोकादायक इमारती ठरविण्याच्या निकषांबाबत नागरिकांच्या भावना तीव्र असून त्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारादेखील मुंडे यांनी या वेळी दिला.नौपाड्यातील इमारतीला पालिकेने बजावली नोटीस१ठाणे : बी केबिन परिसरातील कृष्ण निवास इमारत कोसळल्यानंतर त्यामागे असलेल्या गणेश दर्शन या इमारतीला आता पालिकेने धोकादायकची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या ३१ कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे येथील रहिवाशांनी यापूर्वीच या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले आहे. त्यानुसार, आता ते तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.२कृष्ण निवास इमारतीच्या अगदी पाठीमागील बाजूस असलेली गणेश दर्शन ही इमारत २० वर्षे जुनी असून आता त्या इमारतीला पालिकेने धोकादायकची नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये या इमारतीच्या बिम्सला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे नमूद केले आहे. तसेच स्लॅबमध्ये लिकेज, स्लॅबचे प्लॅस्टर निघून सळया उघड्या पडून गंजलेल्या आहेत.३इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कॉलम व बिम्सला तडे गेले आहेत. त्यामुळे या इमारतीच्या धोकादायक भागाचा वापर करू नये, अन्यथा एखादी दुर्घटना घडली तर त्याला पालिका जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार, नोटीस मिळताच पुढील सात दिवसांत हा धोकादायक भाग पाडण्यात यावा. यापुढेही जाऊन इमारत संपूर्णच धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यास ही इमारत पूर्णपणे तोडावी, असेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.४येथील रहिवाशांनी पालिकेच्या या नोटीसविरोधात प्रभाग समितीत जाऊन पालिका अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असून आम्ही इमारतीचे यापूर्वीच स्ट्रक्चरल आॅडिट केल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, आता ते पाहूनच पुढील कारवाई निश्चित केली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून मिळाला २५ लाखांचा ऐवज‘कृष्णा निवास’ या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे जीव वाचविताना त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाचे कामही ठाणे महापालिकेच्या अग्निशमन आणि एनडीआरएफच्या जवानांनी केले. या जवानांनी आतापर्यंत रोख दोन लाख ७० हजारांसह २५ ते ३० लाखांचा ऐवज मिळाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.मंगळवारी पहाटे १.५५ वा. ही इमारत कोसळल्यानंतर बहुतांश रहिवासी हे साखरझोपेत होते. त्यामुळे त्यांना सामान वाचविणे किंवा स्वत:चा जीव वाचविण्यासाठी अवधीही मिळाला नाही. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळल्यानंतर दाखल झालेल्या जवाहरबाग आणि वागळे इस्टेट अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीला आलेल्या एनडीआरएफच्या ५० जणांच्या टीमने सात जणांना सुखरूप बाहेर काढले. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे, दोन लाख ७० हजार रुपये, २५ किमती घड्याळे, तीन कॅमेरे, २० मोबाइल, ७० ते ७५ तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी आणि इतर काही सामग्री असा लाखोंचा ऐवज या जवानांनी नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या सर्व ऐवजाचा पंचनामा करण्यात आला असून सर्व ऐवज ओळख पटवून संबंधितांच्या ताब्यात देणार असल्याचे नौपाडा पोलीसांनी स्पष्ट केले.पोलीस करणार चौकशी‘कृष्णा निवास’ ही नौपाड्यातील ५५ वर्षे जुनी इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू आणि सात रहिवासी जखमी झाले आहेत. या घटनेला नेमकी कोणती कारणे आहेत, त्यामध्ये दोषी कोण आहेत, याबाबतची सखोल चौकशी करणार असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. तूर्तास आकस्मिक मृत्यू इतकीच नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी घटनास्थळी भेट दिल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी इमारत दुर्घटनेप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून घटनेसंबंधी सर्व बारकावे तपासण्यात येणार आहेत.घरमालक आणि येथील रहिवासी असलेले भाडेकरू यांच्यातील वाद, इमारत धोकादायक होती का, पालिकेनेही याबाबत नेमकी काय भूमिका बजावली होती, तळ मजल्यावर कोणाकडून आणि कसले बांधकाम करण्यात येत होते, असा तपास करण्यात येणार आहे. जखमींच्या औषधोपचारासाठी योग्य ती मदत मिळण्याला प्राधान्य देण्यात येईल. (प्रतिनिधी)