शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यावर मेहेरबानी कशासाठी?

By admin | Updated: June 16, 2014 04:09 IST

पोलीस भरतीप्रक्रियेदरम्यान १०० मीटरचा ट्रॅक ८० मीटरचा झाल्याच्या प्रकरणाची गोपनीय चौकशी होऊन सदरचा अहवाल पोलीस महासंचालकांना धाडण्यात आला आहे

नाशिक : पोलीस भरतीप्रक्रियेदरम्यान १०० मीटरचा ट्रॅक ८० मीटरचा झाल्याच्या प्रकरणाची गोपनीय चौकशी होऊन सदरचा अहवाल पोलीस महासंचालकांना धाडण्यात आला आहे. मात्र त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यावर मेहेरबानी कशासाठी, याचीच चर्चा पोलीस वर्तुळात आहे. सदरच्या अहवालामध्ये क्रीडा प्रकाराशी संबंधित एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आल्याचे समजते. संबंधित कर्मचाऱ्याकडून पोलीस मुख्यालयातच पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालविले जात असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आल्याचे समजते. नेहमीच अति‘दक्ष’ असणाऱ्या पोलीस आयुक्तांकडून ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यावर मेहेरबानी कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.शहर पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या अनेक प्रकारांनी वादग्रस्त ठरू पाहत आहे. भरतीच्या पहिल्याच दिवशी १०० मीटरचा ट्रॅक ८० मीटर केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या गोपनीय विभागाकडून चौकशी करण्यात येऊन सदरचा अहवाल नुकताच पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना धाडण्यात आल्याचे समजते. यात पहिल्या दिवसाच्या ट्रॅकची आखणी जाणीवपूर्वक केल्याचे समजते. भरतीच्या मैदानाची आखणी पोलीस दलातीलच एका पोलीस कर्मचाऱ्याकडून करण्यात आली होती. सदरचा कर्मचारी हा क्रीडा क्षेत्रातला असून, पोलीस मुख्यालयाच्या आवारातच तो पोलीस प्रशिक्षण भरती केंद्रही चालवितो. मुळात पोलीस मुख्यालयाच्या आवारात अशा प्रकारचे केंद्र चालविणे बेकायदा आहे.संबंधित कर्मचाऱ्यावर यापूर्वीही पोलीस भरतीप्रक्रियेदरम्यान वशिलेबाजी केल्याचा आरोप झाल्याचे समजते. त्यामुळे त्यास भरतीप्रकियेपासून दूर ठेवण्यात आले असतानाही या वेळी त्याच व्यक्तीवर मैदानाची आखणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)