शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

डॉक्टरांच्या भाषेत ‘प्रेम’ म्हणजे काय असतं?

By admin | Updated: February 13, 2017 20:53 IST

७ ते १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन वीक’. आपल्या तरूणासाईसाठी ही एक पर्वणीच. रोमॅण्टिक असणाऱ्या या वीकमध्ये आपण कोणालातरी ‘मन की बात’ सांगून समोरच्याकडून

सोमनाथ खताळ/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 13 -  ७ ते १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन वीक’. आपल्या तरूणासाईसाठी ही एक पर्वणीच. रोमॅण्टिक असणाऱ्या या वीकमध्ये आपण कोणालातरी ‘मन की बात’ सांगून समोरच्याकडून ‘टू यू’ ची अपेक्षा करतो. परंतु हे करण्यापूर्वी तिला किंवा त्याला मी ‘प्रपोज’ केलेले आवडेल का? तिच्या मनात माझ्याबद्दल काही ‘फिलिंग्स’ असतील का? घरी समजेल का? आपल्याला हा ‘प्रपोज’ महागात तर पडणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांच काहूर माजलेलं असतं. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आपल्याला ओढ लागते ती व्हॅलेंटाईनची. याच दिवसांपासून दोन जिवांचे मिलन होऊन अनेकांच्या जीवनाची सुरूवात होते तर काहींचे ‘ब्रेकअप’. त्यामुळे हा सप्ताह आपल्यासाठी खुपच ‘इम्पॉर्टटंट’ समजला जातो. आता या ‘व्हॅलेंटाईन’लाही आपण सर्व सज्ज झाला असालच. तो फिर देर किस बात की है, आओ आगे बढो. और बोलो, ‘आय लव्ह यू’. याचवेळी आपल्याला मिळतील असंख्य प्रश्नांची उत्तरं, जी आपल्या मनात वर्षभर घर करून मनात भीती घालत होती. या ‘लव्ह’ बद्दल डॉक्टर काय म्हणतात, हे ही जाणून घेतले आहे. त्यांच्या भाषेत ‘प्रेम’ म्हणजे काय असतं? यावर टाकलेला हा प्रकाश.‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’चा विसर असणाऱ्या तरूणाईला वेध लागते ते ‘व्हॅलेंटाईन’चे. हे तसं प्रत्येक वर्षीचंच. एकही वर्ष असे नसेल जे आपण हा ‘व्हॅलेंटाईन वीक’चे ‘सेलिब्रेशन’ कोणा एका खास व्यक्ती बरोबर केलं नसेल. दिवसेंदिवस हा ट्रेंड बदलत चालला आहे. तंत्रज्ञान आणि धावपळीच्या जीवनात आपले प्रेमही तसेच झाले आहे. कधी काळी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये आपल्याला कोणीतील मोरपीस दिलेला असतो किंवा गुलाबाचे फुल. ते देण्यामागे खुप निस्वार्थ आणि प्रामाणिकता दडलेली असायची. तो मोरपीस एखाद्या पुस्तकात किंवा वहीत जीवापाढ जपला जायचा. जेव्हा केव्हा आठवण होईल, तेव्हा त्याला पाहण्यात आपण समाधान मानायचो. पण आता ‘व्हॉट्सअ‍ॅप’ व ‘फेसबुक’च्या जमान्यात हे पूर्णता: बंद झाले आहे. लहान मुलांना तर या मोरपीसाची गोष्टही माहित नसेल. त्यांना माहित आहे फक्त टिव्हीवरील कार्टून शो.आज आम्ही कॉलेजच्या कट्टयावर बसतो. तेव्हा आम्हाला दिसते ती ‘ब्युटीफूल गर्ल’. चालणं, दिसणं, बोलणं आणि तिची सेक्सी आणि हॉट स्टाईल. आपणही याला भाळतो. आणि कुठलाही विचार न करता या सर्व गोष्टी पाहून तिच्या प्रेमात पडायला लागतो. तिचे बॅकग्राऊंड काय, ती काय करते, हे न पाहताच आपण तिच्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून तिच्यामागे फिरत असतो. पण यामध्ये आपले शिक्षण, वेळ, संस्कार कोठेतरी मागे राहत आहे का? याचा कधीच विचार करीत नाही. आपल्याला झोपताना, जेवताना फक्त ती आणि तीच दिसते. अनेक दिवस मागे फिरल्यानंतर आपण तिला प्रपोज करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन’चे मुहूर्त निवडतो. गुलाबाचं फुल घ्यायचं. तिला फोन करायचा. आणि ठरलेल्या ठिकाणी बोलवायचं. आल्यावर हातात गुलाबाचं फुल द्यायचं आणि ‘आय लव्ह यू’ बोलून मोकळं व्हायचं. ती पण आपल्या मनातील ‘प्रेम’ व्यक्त करून आयुष्यभर साथ देण्यासाठी तयार होते. परंतु सगळेच असा प्रपोज करतात का? तर नाही. काहींना वेळ नसतो, तर काहींना भिती वाटत असते. म्हणून ते फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रपोज करून मोकळं होतात. परंतु या सोशल मिडीच्या माध्यमातून भावना तिच्यापर्यंत पोहचतात का? याचा आपण कधीच विचार करीत नाही. म्हणून जे प्रेम आपल्याला जेवढ्या ‘फास्ट’ मिळते, तेवढ्याच फास्ट त्याचा ‘ब्रेकअप’ही होतो, हे आजपर्यंतचं ‘रेकॉॅर्ड’ आहे.दुसरं म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ आम्हाला माहित आहे का? हेच तपासण्याची गरज आहे. आज अगदी पाचवी-सहावीचे पोरंही मला कोणावर तरी प्रेम झाल्याचा डांगोरा पिटत फिरतात. त्यांना एवढेच माहित असते की, ती खुप सुंदर आहे, मला खुप बोलते, माझ्याकडे एकटक पहाते, मला रात्ररात्र फोनवर बोलते. पण एवढं झालं म्हणजे झालं का प्रेम. नाही. कारण या मुलांना एखाद्याच्या शरिराचे आकर्षण असते. आणि त्याच्यावरच ते प्रेम करतात. आणि जेव्हा या प्रेमाचा काडीमोड होतो, तेव्हा मात्र त्यांना हे असह्य होते, आणि ते वेगळ्या मार्गाने पाऊल उचलतात. या मुलांची मानसीक संतूलन बिघडते. सतत उदास आणि चिडचिड करतात. या ताणतणावातून ते मग ड्रींक आणि स्मोकिंगसारख्या व्यसनं करायला लागतात. अनेकवेळा ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलायला मागे पुढे पाहत नाहीत, असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अनिल बारकुल यांनी सांगितले. ज्या मुलांची मानसिक, बौद्धीक आणि शारिरिक वाढ झालेली नाही, परंतु दिसण्यावर, राहण्यावर, बोलण्यावर किंवा ‘एन्जॉय’ म्हणून प्रेम करतात, अशांसाठी प्रेम म्हणजे केवळ ‘टाईमपास’ असतो, असेही डॉ. बारकुल म्हणाले.‘ती’ यावर्षी माझी होणार...‘सैराट’ आणि ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटांनी तर आमच्या मनात घरच केलं आहे. आम्ही कॉलेजच्या कट्टयावर असो किंवा शाळेतील बँचवर. फिल्डवर असो की आॅफिसमध्ये. चर्चा फक्त एकच. ‘ती सध्या काय करते’. पण आम्ही यावर्षी याचे उत्तर देणार, असाच काहीसा दृढ निश्चय केला आहे. ती सध्या काय करते हे सांगण्यापेक्षा ‘ती यावर्षी माझी होणार’, हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघच. जवळपास तिला प्रपोज करण्याची प्लॅनिंग झाली असून आता वाट पाहत आहोत ती फक्त १४ फेब्रुवारी येण्याची.‘प्रेम’ म्हणजे जीवनाच्या बागेतील फुल‘प्रेम’ जीवनाच्या बागेत अलगद उमललेले एक फूल. प्रेमाच्या बंधनात अडकल्यावर सगळं काही बदलायला लागतं. त्यांच्या राहण्यात वागण्यात, बोलण्यात चालण्यात बदल दिसू लागतो. त्यांची छाती जणू प्रेम झाल्यामुळे एकप्रकारे अभिमानाने फुगत असते. ‘तो’ तिच्यासाठी आणि ‘ती’ त्याच्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करू लागतात. हे दोन जीव जेव्हा एकमेकांचे मन समजून घेतात, तेव्हाच ते जीवनसाथी बनतात. अन्यथा त्यांच्या प्रेमात ‘ब्रेकअप’ व्हायला क्षूल्लक कारणही पुरेसे ठरते.प्रेम करा, पण सांभाळून...फास्ट लव्ह झाले तर त्याचे ब्रेकअपही तेवढेच फास्ट होते. मग ही मुले व्यसनाधिनतेकडे वळतात. स्मोकिंग, ड्रिंकींग केल्यामुळे त्यांना आजार जडतात. असे प्रकार मेट्रोसीटिमध्ये अधिक पहावयास मिळतात. या लहान मुलांचे जर संबंध आले तर ‘अर्ली एज प्रेग्नेंसी’ होण्याची भिती असते. तसेच गुप्तरोगही होऊ शकतात. कायद्याने ठरवून दिलेल्या वयातच संबंध ठेवणे गरजेच आहे. पण काहीजण प्रेमाच्या नावाखाली भलत्याच भानगडी करतात, हे पण तितकेच खरं आहे, असे फिजिशिअन तज्ज्ञ डॉ.अनिल बारकुल यांनी व्यक्त केले.प्रेमात प्रामाणिकता असावी..प्रेम तुम्ही कोणावर करता, यापेक्षा कसे करता आणि त्यात किती निस्वार्थ आणि प्रामाणिकता आहे, याला अधिक महत्व असते. तरूणांनी ‘टाईमपास’ म्हणून प्रेम करू नये, तर प्रेमात टाईमपास करावा. एकमेकांचे मन समजावून घ्यावेत. प्रेमाचा अर्थ समजला की, सर्व काही सोपं होतं. केवळ शरिर सुखासाठी अनेकजण प्रेम करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते. तर असे होऊ नये. यासाठी काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.संजय जाणवळे यांनी सांगितले.