शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मुस्लिम आरक्षण देण्यात अडचण काय?; समाजवादी पक्षाने उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 09:41 IST

गेली दीड वर्षे मुस्लिम समाजाच्या पाहणीस महायुती सरकार का वेळकाढूपणा करीत आहे, असा सवाल पत्रात करण्यात आला आहे. 

मुंबई - भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिम आरक्षणाची ग्वाही दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातही मुस्लिम आरक्षणाची मागणी पुढे आली आहे. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण द्या, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी केली आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी आरक्षणाची मागणी केली आहे. राज्यातले महायुती सरकार इतर जात गटाचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करीत आहे. मग, टाटा समाज विज्ञान संस्थेकडून करण्यात येणाऱ्या मुस्लिम समाजाच्या सर्वेक्षणात काय अडचण आहे? गेली दीड वर्षे मुस्लिम समाजाच्या पाहणीस महायुती सरकार का वेळकाढूपणा करीत आहे, असा सवाल पत्रात करण्यात आला आहे. 

एनडीएमधील भाजपचा सहयोगी पक्ष टीडीपी आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षणाची ग्वाही देत असेल तर राज्यातील महायुती सरकारला ५ टक्के मुस्लिम आरक्षण देण्यात काय अडचण आहे? असा सवाल आमदार शेख यांनी केला आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीम