शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख द्यावे लागतात हे कोणत्या नैतिकतेत बसते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 05:00 IST

राजन गवस यांचा सवाल : उदगीरच्या साहित्य संमेलनात रंगली मुलाखत

राम शिनगारेभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर (जि. लातूर) : समाज घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वाचा असतो. आज शालेय पातळीवर दर्जेदार शिक्षक मिळणे दुरापास्त झाले आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख रुपये द्यावे लागतात. हे कोणत्या नैतिकतेत बसते? असा सवाल करीत संस्थाचालक आणि सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केला. उदगीर येथे सुरू असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक राजन गवस यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे आणि पुण्यातील विनोद शिरसाट यांनी त्यांना बोलते केले. 

डॉ. गवस म्हणाले, आमच्या कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. वर्ष संपले की, गेला का पुढच्या वर्गात असे विचारले जायचे. गुरं-ढोरं सांभाळत, उनाडक्या, शेतात काबाडकष्ट करीत आमचे बालपणातील शिक्षण झाले. बालपणात लिहिलेली चार ओळींची बेढर नावाची कविता दादा सबनीस यांनी छापली. हाच आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. कवितेने मला जगवले.  यानंतर कथांमधून कृषक समाजाचे चित्रण रेखाटले. हे माझ्या आयुष्याच्या संबंधितच होते. महाविद्यालयीन चळवळीत काम करताना आलेल्या अनुभवातून, वैतागातून चौंडक, भंडारभोग या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. २५ वर्षांनंतर याच कादंबऱ्यांवर जोगवा  नावाचा चित्रपट निघाला. तणकट, ब-बळीचा या कादंबऱ्या गावातील जातीयता, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आहेत, असेही गवस यांनी सांगितले.

कृषिजन व नागर लोकांचे आयुष्य भिन्नग्रामीण भागातील लोक जेवण करताना पहिला घास इतरांसाठी बाजूला काढून ठेवतात. तेच नागर संस्कृती असलेल्या शहरात होत नाही. शहरात देणारे नव्हे ओरबडणारे असतात. त्यामुळे कृषिजन आणि नागर भद्र लोकांचे आयुष्य भिन्न स्वरूपाचे असल्याचे मत राजन गवस यांनी मांडले.

होय, मी नेमाडपंथीमुलाखतकारांनी आपण नेमाडे घराण्याचे असल्याचे बोलले जाते, अशी चर्चा नेहमी होते, असा प्रश्न विचारला. त्यावर गवस यांनी होय मी नेमाडपंथी आहे, असे स्पष्ट केले. तसेच ज्यांनी कांदबरी लिहिण्याचे बळ दिले. त्यांच्या नावाने आपल्याला ओळखले जात असेल तर त्यात काय चूक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.