शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

दहशतवादी हल्ला झाला तर?

By admin | Updated: December 17, 2014 00:37 IST

शहरातील सहा हजार आणि बाहेरचे चार हजार पोलीस अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आहेत. तरीसुद्धा शहरात खून, बलात्कार, चेनस्रॅचिंग, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि लुटमारीचे गंभीर गुन्हे रोजच घडत आहेत.

मॉलमध्ये सुरक्षेचे तीनतेरा : टार्गेट कसे रोखाल ?नरेश डोंगरे - नागपूरशहरातील सहा हजार आणि बाहेरचे चार हजार पोलीस अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आहेत. तरीसुद्धा शहरात खून, बलात्कार, चेनस्रॅचिंग, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि लुटमारीचे गंभीर गुन्हे रोजच घडत आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहे. त्यामुळे नागपूरकर कमालीचे अस्वस्थ आहेत. स्थानिक गुन्हेगारांना रोखण्यात पोलिसांना यश मिळत नाही, तेथे उपराजधानीत दुर्दैवाने दहशतवादी हल्ला झाला किंवा ‘सिडनी’सारखी ओलीस ठेवण्याची घटना घडली तर काय होईल, असा धडकी भरवणारा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. यापूर्वी काय घडले उपराजधानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे सर्वश्रुत आहे. कोणत्याही वेळी येथे घातपात होऊ शकतो. यापूर्वी येथे दोनदा घातपाताचे प्रयत्न झालेले आहेत. महालमधील बडकस चौकात २००४ मध्ये पाईप बॉम्ब ठेवले गेले. २००६ मध्ये संघ मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. उपराजधानीत बांगलादेशी घुसखोरांची संख्या सारखी वाढत आहे. मॉलमध्ये सुरक्षेत गोलमाल शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरचा पोलीस बंदोबस्त ठिकठाक आहे. मात्र, अन्य ठिकाणी गोलमाल आहे. सीताबर्डीतील मॉलसह शहरातील बहुतांश मॉल-मल्टिप्लेक्समध्ये सुरक्षेची व्यवस्था कमकुवत आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही. दोन-चार गणवेषधारी सुरक्षारक्षक तेवढे तेथे उभे दिसतात. हीच अवस्था बहुतांश बड्या हॉटेलमधील आहे. बहुतांश नामांकित शाळा, महाविद्यालयात सुरक्षा व्यवस्थेची स्थिती फारच चिंताजनक आहे. सध्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत अनाहूत पाहुण्यांची गर्दी वाढली आहे. या गर्दीत कोणता दहशतवादी, कोणत्या वेळेला, कुठून येईल आणि यापैकी कोणत्या ठिकाणातील उपस्थितांना वेठीस धरेल, त्याचा नेम नाही.उपराजधानीचे महत्त्वकेंद्र आणि महाराष्ट्रासह अनेक राज्याची ‘प्रेरणाभूमी’ नागपूर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी, ताजुद्दीन बाबांचा दर्गा, रेल्वेस्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ ही महत्त्वपूर्ण तेवढीच संवेदनशील स्थळे आहेत. यातील संघ मुख्यालय आणि रेल्वेस्थानक दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे जगजाहीर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नागपुरात वास्तव्याला असतात. शिवाय केंद्रातील मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ‘प्रेरणाभूमी’त नेहमीच ये-जा असते.सुरक्षा यंत्रणाच खिळखिळीदहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक शाखेची अवस्था फारच वाईट आहे. संघ मुख्यालयावर हल्ला झाल्यानंतर येथे एटीएसचे युनिट देण्यात आले. उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी येथील प्रमुख राहील असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रारंभापासूनच येथील युनिटला तो अधिकारी मिळाला नाही. ९ अधिकारी आणि ५५ कर्मचाऱ्यांचे संख्याबळ मंजूर असताना ६० टक्के संख्याबळावर सध्या एटीएसचे काम सुरू असल्याचे समजते. जे आहेत, त्यांच्याकडे अत्याधुनिक साधन सुविधा नाहीत. अत्याधुनिक हत्यारे, बुलेटप्रूफ जॅकेट नाहीत. या युनिटमध्ये स्वेच्छेने कोणता अधिकारी आल्याचे ऐकिवात नाही. जे येतात ते टाईमपास करतात. त्याचमुळे या युनिटकडून गेल्या सहा वर्षात कोणतीही उल्लेखनीय कामगिरी झालेली नाही. येथे पुरुषोत्तम चौधरी नामक अधिकारी असताना स्थानिक युनिटने अनेक चांगल्या कामगिरी बजावल्या होत्या. दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीच्या आरोपींशी संबंध असलेल्या ताल्लाह आमिर या अभियंत्याला धावत्या ट्रेनमध्ये पकडण्याची कामगिरी चौधरी यांनी बजावली होती. मुंबईतील लोकल ट्रेनमधील स्फोटाच्या मालिकेचा मास्टर मार्इंड, त्याचा साथीदारही नागपुरात पकडला गेला होता. दंगली भडकावण्याच्या आरोपात एका परप्रांतीयालाही अटक करण्यात आली होती. त्यांच्यानंतर अशी कोणती महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली गेली नाही. गेल्या वर्षी बिहारमधील स्फोटाचा संशयित नागपुरात लपून होता. तो निघून गेल्यानंतर स्थानिक सुरक्षा व्यवस्थेला त्याची माहिती कळाल्याचे चर्चा सुरू झाली होती. हीच स्थिती नक्षलविरोधी अभियानाची (एएनओची) आहे. गडचिरोलीशी संबंध ठेवणारे नक्षलवादी समर्थक कोल्हापूर, पुण्या, मुंबईत पकडले जातात. स्थानिक युनिटला मात्र कुठेही काही सापडत नाही.