शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

रायगडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसताना घडले ते आश्चर्यकारक - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 15:22 IST

मागच्या दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनवेळा हॅलिकॉप्टर अपघातातून सुदैवाने बचावले. याविषयी बुधवारी राज्याच्या विधानपरिषदेत चर्चा झाली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनवेळा हॅलिकॉप्टर अपघातातून सुदैवाने बचावले. रायगडमध्ये हॅलिकॉप्टर सुरु ठेवून बसण्यास सांगण्यात आले

मुंबई, दि. 26 - मागच्या दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनवेळा हेलिकॉप्टर अपघातातून सुदैवाने बचावले. याविषयी बुधवारी राज्याच्या विधानपरिषदेत चर्चा झाली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसताना जे घडले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. लोकमतनेच सर्वप्रथम यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. 

हेलिकॉप्टर बंद झाल्यानंतर आपण उतरतो तसेच हेलिकॉप्टरमध्ये सर्व बसल्यानंतर उड्डाण घेण्याची प्रक्रिया सुरु होते. पण रायगडमध्ये हेलिकॉप्टर सुरु ठेवून बसण्यास सांगण्यात आले त्याचे आश्चर्य वाटते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  या प्रकरणाची डीजीसीएने नेमलेल्या तपास पथकाकडून चौकशी सुरु आहे. स्वतंत्र समितीकडून तपास सुरु आहे. त्यामुळे लवकरच तथ्य समोर येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

आज विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सभापतींकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. राज्याच्या प्रमुखाच्या हेलिकॉप्टरबरोबर असे घडत असेल तर सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे मुंडे म्हणाले. 

काय घडले रायगडमध्ये सात जुलै रोजी मुख्यमंत्री अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उदघाटन सोहळा आटोपून डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले.

लातुरात हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले!25 मे रोजी लातुरात मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी जमलेल्या प्रचंड गर्दीवर धूळ उडवत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले आणि काही क्षणात ते जवळच्याच झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले होते. धुळीचे लोट असल्याने नेमके काय घडले ते कोणालाच कळले नाही... पायलट संजय कर्वे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जण बालंबाल बचावले होते. या अपघातात पायलट कर्वे यांच्यासह इतर दोघे नागरिक किरकोळ जखमी झाले होते. निलंगा (जि. लातूर) येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानाजवळ सकाळी ११.४९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता.