शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर कोणत्या सुविधा पुरविणार

By admin | Updated: January 25, 2017 20:00 IST

आगामी विविध निवडणुकांमध्ये दिव्यांगांना विनाकष्ट मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, हॅन्डरेल्स यासारख्या कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येणार

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - आगामी विविध निवडणुकांमध्ये दिव्यांगांना विनाकष्ट मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, हॅन्डरेल्स यासारख्या कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाला केली असून त्यावर येत्या २ फेब्रुवारी रोजी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शासकीयइमारतींमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प, लिफ्ट, स्वच्छतागृहे, पार्किंग इत्यादी विशेष सुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी इंद्रधनू या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिव्यांगांना मतदान केंद्रांवरही आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन याप्रकरणात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्याची अनुमती मागण्यात आली. न्यायालयाने ही अनुमती प्रदान करून वरीलप्रमाणे निर्देश दिलेत.
संस्थेची ही दुसरी जनहित याचिका होय. जुन्या इमारतींमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि  महानगरपालिकेंतर्गत येणाºया पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही महानगरपालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढली होती. परंतु, महानगरपालिकेने ग्वाहीचे पालन केले नाही. परिणामी संस्थेने दुस-यांदा न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी बाजू मांडली.