शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

आपण काय करू शकतो़

By admin | Updated: October 4, 2015 01:22 IST

जागतिक बँकेने केलेल्या व्यापारविषयक पाहणीचे निष्कर्ष काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले. व्यापार-उद्योगविषयक ९८ सुधारणांची अंमलबजावणी करण्याबाबतची ही पाहणी होती.

- सतीश रानडे (लेखक हे अर्थतज्ज्ञ आहेत.)जागतिक बँकेने केलेल्या व्यापारविषयक पाहणीचे निष्कर्ष काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले. व्यापार-उद्योगविषयक ९८ सुधारणांची अंमलबजावणी करण्याबाबतची ही पाहणी होती. हे निष्कर्ष आपल्या भारतीयांना व महाराष्ट्राला भूषणावह नाहीत. १८९ देशांच्या क्रमवारीत आपला १२५ कोटी लोकसंख्या असलेला देश १४२ क्र मांकावर आहे. ११ कोटी लोकसंख्या असलेला आपला महाराष्ट्र देशात ३२ राज्यांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १७ बि. डॉलर, चीनचे १0 बि. डॉलर तर भारताचे फक्त २ बि. डॉलर इतके आहे. महाराष्ट्राचे दरडोई वार्षिक सकल उत्पन्न अंदाजे फक्त दोन लाख रुपये आहे, ही विचार करायला लावणारी परिस्थिती आहे.आपला देश व आपले राज्य दुष्काळ, पायाभूत सुविधांचा अभाव, शिक्षणाची दुरवस्था, धार्मिक पगडा, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, राजकीय अनास्था, भोगवादाचा बेगडीपणा, वैयक्तिक शिस्तीचा अभाव, जातीव्यवस्था, विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये अडकून पडला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा काही मोजक्या शहरांत झालेले लोकसंख्येचे ध्रुवीकरण व तथाकथित समृद्धी ही प्रगती नसून सूज असल्याचे लक्षात येते. संस्कार, नीती वगैरेंची समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांना पुढाकार घ्यावा लागतो. ही वैयक्तिक जबाबदारी व कर्तव्य नाही का? अशावेळी काही गोष्टी आपोआप घडतील, त्याची वाट दैववादी पद्धतीने बघत बसण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत: जबाबदारी घेऊन नवीन उद्यमशीलता अमलात आणण्याची गरज आहे. जमेची बाजू म्हणजे ४३ टक्के लोकसंख्या २0 ते ५0 या तरुण व क्रि याशील वयातील आहे. आपणा सर्वांना सर्व सुखसोयी हव्या आहेत, त्यासाठी काम मात्र आपल्यालाच करायला हवे. अनेक वर्षे नोकरी शोधत बसण्यापेक्षा नवीन उद्योग, कल्पनाशक्ती, जोखीम घेण्याची तयारी या गुणांचा वापर करून देशातच असलेल्या १२५ कोटी एवढ्या प्रचंड मागणीला पुरवता येईल अशी उत्पादने व सेवा निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला आहे. परकीय कंपन्या येथे येऊन आपल्याकडील प्रचंड मागणीचा फायदा घेतात आणि आपण मात्र त्या कंपनीत नोकरी करण्यात धन्यता मानतो. विचार करा, भारताचा विकासदर ७.५ टक्के आहे, तर अमेरिकेचा ३.१ टक्के आहे. मग कुठे आहेत जास्त संधी व कोण त्याचा फायदा घेतंय? वेगवान बदलाची राजकीय इच्छाशक्ती जरी क्षीण असली तरी जास्तीत जास्त जनता त्यांच्या वैयक्तिक इच्छाशक्तीने चमत्कार घडवू शकते. केवळ सरकारवर अवलंबून राहण्यात कोणतेही शहाणपण नाही. गंमत पाहा की ३0 - ४0 वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राची/भारताची औद्योगिक प्रगती इंजिनीअरिंग कॉलेजेस कमी असताना झाली. आज ज्या प्रमाणात इंजिनीअरिंग व इतर शैक्षणिक संस्था वाढल्या आहेत, त्या प्रमाणात औद्योगिक व आर्थिक प्रगती झाली आहे का?आपण सगळ््यांनी नवनवीन कल्पना, तंत्रज्ञान, धाडस, पारदर्शकता, उद्योगशीलता, सहकार्याची भावना अंगीकारून व्यक्ती व समाजाचा विकास घडविण्याची गरज आहे, त्यासाठी अमाप संधी उपलब्ध आहेत. चांगल्या, नैतिक व समाजोपयोगी कल्पनेला प्रत्यक्षात आणायला आज कोणत्याही साधनांची कमतरता नाही. गरज आहे ती सर्व क्षेत्रांत पुढाकार घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द दाखविण्याची. आपल्याकडे काय नाही याचा पाढा वाचण्यापेक्षा, जे आहे त्याचा सर्वोत्तम वापर करून नवनिर्मिती करण्यातच आपले व देशाचे आर्थिक हित आहे.