शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अनौरस मूल अनुकंपा नोकरीस पात्र?

By admin | Updated: January 16, 2015 06:01 IST

सरकारी कर्मचा-याचे सेवेत असताना निधन झाल्यावर त्याच्या अनौरस मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का

मुंबई : सरकारी कर्मचा-याचे सेवेत असताना निधन झाल्यावर त्याच्या अनौरस मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का, हा कायद्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे फेरविचारासाठी परत पाठविला आहे.अमरावती महापालिकेतील एक लिपिक उकरडा पुंडलिकराव अठोर (आठवले) यांचे १८ जून १९९७ रोजी निधन झाल्यावर महापालिकेने त्यांचा अनौरस मुलगा सागर यास सप्टेंबर २०१२मध्ये अनुकंपा नोकरी दिली. सागरची विवाहित सावत्र बहीण विजया उकरडा अठोर (आठवले) हिने त्याविरुद्ध केलेली याचिका व फेरविचार अर्ज नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी मार्च व नोव्हेंबरमध्ये फेटाळले होते. त्याविरुद्ध विजयाने केलेले अपील मान्य करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. व्ही. गापाळ गौडा व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील वादमुद्दा फेरविचारासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविला.दिवंगत उकरडा अठोर यांना शांताबाई व कुंताबाई अशा दोन पत्नी होत्या. त्यांना शांताबाईपासून विजया ही मुलगी तर कुंताबाईपासून सागर हा मुलगा झाला. उकरडा यांचे निधन झाले तेव्हा विजया १७ वर्षांची होती व इयत्ता १०वीत शिकत होती. विजया सज्ञान झाल्यावर तिला वडिलांच्या जागी अनुकंपा नोकरी द्यावी, असे अर्ज शांताबाई यांनी वर्र्ष १९९७ व ९८मध्ये महापालिकेकडे केले होते. परंतु त्यावर बरीच वर्षे काहीच निर्णय झाला नाही. दरम्यान २००९मध्ये विजयाचे लग्न झाले. अनौरस मुलगा सागर याने अनुकंपा नोकरीसाठी मे २००९मध्ये अर्ज केला. त्यास विजयाने आक्षेप घेतला. तरी त्यास गेल्या वर्षी फेब्रुवारीत नोकरी दिली गेली.उकरडा यांच्या निधनानंतर शांताबाई आणि विजया यांनी दिवाणी न्यायालयाकडून वारसा हक्काचा निवाडा घेतला. त्यानुसार उकरडा यांचे संपूर्ण पेन्शन शांताबार्इंना मिळाले. त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंडाचे पैसे शांताबाई, कुंताबाई, विजया व सागर यांना समसमान मिळाले होते. (विशेष प्रतिनिधी)