पश्चिम रेल्वे आता सुसाट

By admin | Published: July 6, 2017 04:20 PM2017-07-06T16:20:53+5:302017-07-06T17:06:27+5:30

मुंबईच्या पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी आनंदाचं वृत्त आहे. कारण पश्चिम रेल्वेचा प्रवास आता सुसाट होणार आहे.

The Western Railway is now well equipped | पश्चिम रेल्वे आता सुसाट

पश्चिम रेल्वे आता सुसाट

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मुंबईच्या पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी आनंदाचं वृत्त आहे. कारण पश्चिम रेल्वेचा प्रवास आता सुसाट होणार आहे.  प्रवाशांच्या सोईसाठी पश्चिम रेल्वे लोकल सेवा अधिक जलद करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे ताफ्यातील बंबार्डियर लोकलची वेगमर्यादा 110 किमी प्रतितास करण्यात येणार आहे. सध्या सिमेन्स लोकलची वेगमर्यादा 80 किमी प्रतितास आहे. परिणामी, पश्चिम रेल्वेवरील प्रवांशाचा प्रवास अधिक सुसाट होणार आहे.
 
चर्चगेट ते विरार/ डहाणू स्थानकांपर्यंत धावणारी पश्चिम रेल्वेवर प्रवासी संख्या वाढत आहे. परिणामी, स्थानकांवरील गर्दी नियंत्रणासाठी लोकलच्या वेळेचेदेखील काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली. सध्या परेच्या ताफ्यात सिमेन्स आणि बंबार्डियर प्रकारातील लोकल आहेत. सिमेन्स लोकलची वेगमर्यादा 80-100 किमी प्रतितास आहे. ती वेगमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, बंबार्डियर लोकलची वेगमर्यादा ताशी 110 किलोमीटर करण्यात आली आहे.
 
बोरीवली-विरार/डहाणू या स्थानकादरम्यान लोकलचा वेग वाढवण्यात याव्या, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. स्थानकाचा वेग वाढविल्यास दोन स्थानकांतील अंतरात 1 ते 2 मिनिटांनी फरक पडेल. त्याचबरोबर, भविष्यात पश्चिम रेल्वेवर अधिक लोकल सेवा सुरू करण्याचा मार्गदेखील मोकळा होईल. नव्याने दाखल होणाऱ्या आणि आधुनिक ब्रेक यंत्रणेने सुसज्ज अशा लोकलची वेगमर्यादा ही ताशी 130 किमी प्रतितास असणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा नव्या लोकललादेखील होणार आहे, अशी माहिती परेच्या सूत्रांनी दिली.
(मुंबईतल्या "त्या" शेतकऱ्यांची नावं लवकरच जाहीर करू - मुख्यमंत्री)
(मुंबईत प्रथमच रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट)
(मुंबईतील उड्डाणपूल ‘नो पार्किंग झोन’, पार्किंग केल्यास पोलीस कारवाई)
 
ऑक्टोबरपासून ‘परे’चे नवे वेळापत्रक-
पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यात लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, वातानुकूलित लोकलची चाचणीदेखील सकारात्मक होत असल्याने, लवकरच एसी लोकलदेखील प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
 
 

Web Title: The Western Railway is now well equipped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.