मुंबई : समुद्रसपाटीवर कर्नाटक ते केरळ किनारपट्टीलगत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने अरबी समुद्रातील पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी राज्यासह मुंबईत दडी मारून बसलेल्या पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत गोव्यासह कोकणात काही ठिकाणी पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. ५ जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ६, ७ आणि ८ जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. पुढील ४८ तासांत मुंबई आणि उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २८ अंशांच्या आसपास राहील.
खूशखबर, पाऊस परतणार !
By admin | Updated: July 5, 2015 02:04 IST