शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खैरबंदा जलाशयात पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:12 IST

यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : आढावा बैठकीत दिले निर्देश, शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.धापेवाडा टप्पा १ व टप्पा २ च्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.७) तिरोडा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीेला जि.प.सदस्या विमल नागपुरे, कैलाश पटले, उपसभापती मनोहर राऊत, पं.स.सदस्य हितेंद्र लिल्हारे, कृऊबास संचालक चतूरभूज बिसेन, डॉ. वसंत भगत, भाजप उपाध्यक्ष मनोहर बुध्दे, कार्यकारी अभियंता छप्परघरे, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, उपअभियंता पंकज गेडाम, गायकवाड व लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांची बैठक बोलावून खैरबंदा जलाशयात सध्या स्थितीत ७.०० दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४४ टक्के आहे. त्यांचा फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी व्हावा, यासाठी खैरबंदा जलाशयात पाणीसाठ्याचे पूर्ण संचय करणे आवश्यक आहे. खैरबंदा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रं. १ च्या खैरबंदा उर्ध्वनलिकाद्वारे वैनगंगा नदीचे पाणी उपसा करुन १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात सोडण्याचे निर्देश दिले.धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ योजना ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. सन १९९५ पासून या योजनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आ. रहांगडाले यांच्या कार्यकाळात धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रं. १ पूर्णत्वास आली. या उपसा सिंचन योजनेचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यासाठी १५ आॅगस्ट २०१७ ला यशस्वी चाचणी घेण्यात आली. परंतु उपसा सिंचनातील काही तांत्रीक बिघाडीमुळे चारही पंप सुरु नसल्यामुळे पूर्णपणे खैरबंदा जलाशयात पाणी भरता आले नाही. त्यामुळे त्वरीत पंप दुरुस्ती करण्याचे निर्देश आ.रहांगडाले यांनी दिले होते. त्यानंतर चारही पंप दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे या योजनेचे पाणी खैरबंदा जलाशयात सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणीपट्टीच्या दराबाबत सर्व ग्रामपंचायतीनी शेतकºयांना नोटीसद्वारे माहिती द्यावी. सर्व शेतकºयांनी वेळेवर पाणीपट्टी भरावी असे आ.रहांगडाले यांनी बैठकीत सांगितले.

 

टॅग्स :Damधरण