शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही कल्याणकारी मंडळ स्थापणार

By admin | Updated: January 28, 2016 01:52 IST

मोलकरीण, ऊसतोडणी कामगार, मच्छिमार, बांधकाम कामगारांप्रमाणे वृत्तपत्र विक्रेतेही असंघटितच असून त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ होणे आवश्यक आहे. त्यासाठी ९ फेबु्रवारीला

कोल्हापूर : मोलकरीण, ऊसतोडणी कामगार, मच्छिमार, बांधकाम कामगारांप्रमाणे वृत्तपत्र विक्रेतेही असंघटितच असून त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ होणे आवश्यक आहे. त्यासाठी ९ फेबु्रवारीला मुंबईत मंत्रालयात कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्याबरोबर संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने बुधवारी येथे राज्यस्तरीय महाअधिवेशन झाले. उद्घाटनप्रसंगी पाटील म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांची संख्या लक्षात घेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास हरकत नाही. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुकुलता दर्शविली आहे. हे मंडळ स्थापन होईपर्यंत केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी पेन्शन योजनेतही विक्रेते बंधूंनी सहभाग घ्यावा. त्यात प्रत्येक महिन्याला १२ रुपये भरावे लागतील. नैसर्गिक मृत्यू आला तर दोन लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय ४,३०० रुपयांची विमा योजना राबवू. त्यात निम्मा हिस्सा सरकार देईल. वर्षाकाठी २२० रुपये २२ वर्षे भरून निवृत्तीनंतर पाच हजार इतकी पेन्शन योजनाही आहे. त्याचा लाभ आपण घ्यावा. त्यातील निम्मा हिस्सा सरकार भरेल. ही योजना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी सध्या तरी मी घोषित करत आहे, असे पाटील म्हणाले. या योजनेचा लाभ सर्वसाधारण दोन ते अडीच हजार विक्रेत्यांना होईल. अधिवेशनास मुंबई, धुळे, बुलडाणा, गोंदिया, औरंगाबाद, जळगाव, कसारा, यवतमाळ, चंद्रपूर, परभणी, मालेगाव, महाड, अकोला आदी ठिकाणांहून वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पोवार, विभागीय उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, विभागीय सचिव रघुनाथ कांबळे, पश्चिम महाराष्ट्र राज्य सल्लागार शिवगोंड खोत, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन जिल्हा अध्यक्ष किरण व्हणगुत्ते, शंकर चेचर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)