शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराजांच्या पालखीचे मातृतिर्थ नगरीत स्वागत

By admin | Updated: August 1, 2016 21:13 IST

ब्रम्हांडनायक श्री संत गजानन महाराजांच्या पालखीसह दिंडीचे विदर्भाच्या प्रवेशद्वारी आगमन होताच शेकडो भाविकांनी श्रींच्या नावाचा जयघोष करीत पालखीचे १ आॅगस्ट

- ठिकठिकाणी पालखीचे स्वागत:हजारो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शनसिंदखेडराजा (बुलडाणा): ब्रम्हांडनायक श्री संत गजानन महाराजांच्या पालखीसह दिंडीचे विदर्भाच्या प्रवेशद्वारी आगमन होताच शेकडो भाविकांनी श्रींच्या नावाचा जयघोष करीत पालखीचे १ आॅगस्ट रोजी स्वागत केले. टाळ मृदंगासह खांद्यावरपताका घेतलेल्या वारकऱ्यांनी जिल्ह्यात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त केला.आषाढी एकादशीला पंढरपूर येथील विठ्ठल पांडूरंग माऊलीचे दर्शन घेऊन श्रींची पालखी परतीला निघाली. १ आॅगस्ट रोजी पालखीचे नाव्हा मार्गे विदर्भाचे प्रवेशद्वार असेल्या माळसावरगाव घाटातील मुक्तधाम मंदिराजवळ येताच दिंडीतील वारकारी ह्यह्यगण गण गणात बोतेह्णह्ण च्या जयघोषात बँडपथक व टाळमृदंगाच्या तालावर बेधुंद होऊन नाचले. यावेळी माजी जि.प.अध्यक्षा सौ.नंदाताई कायंदे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे, काँग्रेस जिल्हा चिटणीस जगन ठाकरे यांनी स्वागत पालखी व वारकऱ्यांचे स्वागत केले.माळसावरगाव येथे दिंडीतील वारकऱ्यांनी चहा, नाश्ता घेवून नशिराबाद, तुळजापूर, अंचली, डावरगाव, धांदरवाडी, वसंतनगर, नाईकनगर, शेलू, भोसा, दरेगाव मार्गे मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीत आगमन झाले. यावेळी शहरातील भजनी मंडळीसह वारकरी व भावीकांनी शहरातून शोभायात्रा काढली. यावेळी ठाणेदार जाधव, तहसिलदार सुरडकर, बीडीओ जाधव यांनी वारकऱ्यांना चहा नाश्ता देऊन श्रींचे पूजन केले. नंतर दिंडी रामेश्वर मंदिराकडे रवाना झाली.यावेळी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात येवून भाविकांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. गावात ठिकठिकाणी महिलांनी सडा, समार्जन, रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. रामेश्वर मंदिरामध्ये संस्थेचे अध्यक्ष तुळशिराम जामदार, देविदास ठाकरे यांनी समितीच्यावतीने दिंडीतील वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर जिजामाताविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष बाळाजी तायडे, प्राचार्य सुरेश तायडे यांनी विद्यालयामध्ये सर्व वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करुन दिली. जिल्ह्यात आज श्रींच्या पालखीचे आगमन होणार असल्यामुळे जिल्ह्याच्या सिमेपासून तर सिंदखेडराजा पर्यंत भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. पोलिसांनी माळ सावरगाव पासून सिंदखेडराजापर्यंत चोख बंदोबस्तठेवला होता. (शहर प्रतिनिधी)