शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

साखर कारखान्यांबाबत आठवड्यात बैठक

By admin | Updated: March 28, 2017 03:24 IST

साखर कारखानदारी समोरील प्रश्न सोडविण्यासाठी आठवडाभरात उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल

पुणे : साखर कारखानदारी समोरील प्रश्न सोडविण्यासाठी आठवडाभरात उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सहवीज निर्मितीतून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक असणाऱ्या विजेला अधिक दर देण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे. तसेच इथेनॉलचा दर वाढविण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ऊस भूषण पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, पतंगराव कदम, शंकरराव कोल्हे, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, इंद्रजीत मोहिते, जयप्रकाश दांडेगावकर, शिवाजीराव नागावडे, शिवाजीराव गिरिधर पाटील या वेळी उपस्थित होते. यावेळी वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने जुन्नर तालुक्यातील विघ्नहर साखर कारखान्यास गौरविण्यात आले. विलासराव देशमुख उद्योजकता पुरस्कार दौंड शुगर लिमिटेड, तर डॉ. अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्यास देण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे....तर ग्रामीण व्यवस्था उद्ध्वस्त होईलसहवीज प्रकल्पातील वीजदरात झालेली घट, इथेनॉलला मिळणारा कमी दर यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. प्राप्तीकराचा देखील विषय प्रलंबित आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर ग्रामीण व्यवस्था उद्ध्वस्त होईल, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. वीज दर योग्य दिले नाही, तर कारखानदारी अडचणीत येईल, असे कबूल करून मुख्यमंत्र्यांनी साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. या बैठकीचे निमंत्रण शरद पवार यांनाही दिले. राज्यातील जवळपास ७० कारखाने तोट्यात असून, त्यांचा तोटा २ हजार ४४२ कोटींवर गेला आहे. उत्तरप्रदेश उत्पादन व उत्पादकतेतही महाराष्ट्रापुढे गेला आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशात साखर उत्पादन होते. तर, उत्तरप्रदेश लगतच्या दिल्ली, उत्तराखंड आणि इतर काही राज्यात साखर उत्पादित होत नसल्याने त्यांना चांगला दर मिळत आहे. या उलट महाराष्ट्रातून साखर उत्तरेकडील राज्यात पाठवायची असल्यास वाहतूक खर्चात वाढ होते, असे पवार म्हणाले. (प्रतिनिधी)मध्यावधी म्हणजे दबावनीती - पवारमध्यावधी निवडणुका म्हणजे भाजपा आणि सेनेची दबावनीती आहे बाकी काही नाही, असे सांगत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्याच विधानावरुन कोलांटउडी घेतली.राज्यातील सत्ताबदलानंतरच भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद- प्रतिवादाचा खेळ रंगत आहे. विरोधी पक्षाप्रमाणेच शिवसेनेची भूमिका राहिली आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यात मध्यावधीची शक्यता वर्तविली होती.अगदी सुरूवातीस बाहेरुन पाठिंबा आणि नंतर पाठिंबा देणार नाही अशी उलटसुलट राजकीय वक्तव्ये करणाऱ्या पवार यांना मध्यावधी म्हणजे एकमेकांची दबावनीती वाटू लागली आहे.