शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

लग्नसराईची धूम !

By admin | Updated: May 14, 2017 19:35 IST

मोताळा : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्याबरोबरच लग्नसराईचाही शेवटचा महिना असल्याने मोताळा तालुक्यासह परिसरात लग्नसराईची लगबग दिसून येत आहे.

मोताळा : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्याबरोबरच लग्नसराईचाही शेवटचा महिना असल्याने मोताळा तालुक्यासह परिसरात लग्नसराईची लगबग दिसून येत आहे. लग्न सोहळ्याला जाण्यासाठी बसस्थानकामध्ये गर्दी होत आहे. त्यात उन्हाच्या चढत्या पाऱ्याने भर घातली असून, ४२ अंशावर पोहोचलेल्या तापमानामुळे उन्हात लग्न सोहळयासाठी वऱ्हाडी मंडळींची चांगलीच घालमेल होत आहे.मे महिन्यात लग्नसोहळ्याच्या शेवटच्या तिथी आहेत. उन्हाळ्याचा शेवटचा महिना आहे. आठवडाभरापासून तापमान ३८ ते ४२ अंशावर कायम राहत आहे. अनेक लग्नाच्या तिथी एकाच दिवशी असल्याने वऱ्हाडी मंडळींसह नातेवाईक व मित्र मंडळींची चांगलीच दमछाक होत आहे. एकाच तिथीला अनेक लग्न असल्यामुळे कापड व्यवसाय, गिफ्ट सेंटर, ज्वेलरी शॉपवर गर्दी दिसून येत आहे. दुसरीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, सामान्यजणांसह अबालवृद्ध घामाघूम होऊन चांगलेच त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस, थंड शीतपेयाचा आधार नागरिक घेत आहेत. ऐन कडक उन्हात लग्नसराईची धूम असल्याने लग्न सोहळयासाठी मित्र, पाहुणे, नातलग, सहकारी, नातेवाईक यांना कडक उन्हात चांगलीच धावपळ करावी लागत आहे. लग्नसराईच्या तिथी दुपारच्या वेळी व एकाच तिथीला अनेक लग्न असल्याने उन्हात लग्न सोहळयासाठी उपस्थित राहण्यासाठी सर्वांचीच तारांबळ उडत आहे. एकाच तिथीला अनेक लग्न असल्याने कुटुंबातील सर्वच जणांना भावकी व मित्र मंडळींंच्या लग्नाला हजेरी लाववी लागत आहे. अनेक ठिकाणी फक्त भेट तर काही ठिकाणी आहेर पाठवून लग्न साधल्या जात आहे. कडक उन्हाचा मोठा अडथळा असला तरी जवळच्या लग्नासाठी हजेरी लावणे आवश्यक असते. त्यासाठी कोणी सावलीचा, कोणी ज्यूस तर कोणी रसवंतीचा आधार घेत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागल्योन बाटलीबंद तथा आरोच्या पाण्याची मागणी वाढली आहे.  सध्या परिसरात ४२ अंशावर पारा गेला आहे. मात्र पावसाळा जवळ आल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त दिसून येत आहे. तर लग्नसराईमुळे बाजारपेठेतही मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.