शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वेरूळला पकडला होता शस्त्रसाठा

By admin | Updated: July 29, 2016 01:13 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादजवळील बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात ९ मे २००६ रोजी अतिरेक्यांसह शस्त्र आणि आरडीएक्ससारख्या घातक

- विनोद काकडे,  औरंगाबाद

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादजवळील बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात ९ मे २००६ रोजी अतिरेक्यांसह शस्त्र आणि आरडीएक्ससारख्या घातक स्फोटकांचा साठा पोलिसांनी पकडला. या कारवाईमुळे आपले मोठे नेटवर्क नष्ट झाल्याने अन् महाराष्ट्र हादरविण्याचा डाव उधळल्यामुळे अतिरेकी संघटनांना जोरदार झटका बसला होता. त्याचबरोबर अतिरेक्यांची पाळेमुळे भारताच्या मध्यावर असलेल्या मराठवाड्यासारख्या भागात खोलवर रुजल्याचे या घटनेने स्पष्ट झाल्यामुळे भारतीय गुप्तचर संघटना, सुरक्षा यंत्रणांबरोबरच सर्वसामान्यांनाही या कारवाईचा जोरदार ‘हादरा’ बसला होता. हा ‘हादरा’ इतका जोरदार होता की, आज ‘त्या’ घटनेच्या दहा वर्षांनंतरही अतिरेकी संघटना मराठवाड्यात परत डोके वर काढण्याची हिंमत करू शकलेल्या नाहीत. वेरूळच्या घटनेनंतर दहशतवादविरोधी पथकाने मराठवाड्यातील अतिरेक्यांची सर्व पाळेमुळे खोदून काढली होती. एक दशकानंतर पुन्हा एकदा इसिसच्या माध्यमातून अतिरेकी पाळेमुळे मराठवाड्यात रुजविण्याचा काही कट्टरवाद्यांनी प्रारंभ केला आहे; परंतु नुकताच तोही प्रयत्न एटीएसने हाणून पाडला. सुदैवाने महाराष्ट्रावरील अरिष्ट टळलेवेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे सुदैवाने महाराष्ट्रावरील खूप मोठे अरिष्ट टळले होते. १२ मार्च ९३ मध्ये मुंबईत झालेल्या सर्वात मोठ्या साखळी बॉम्बस्फोटात अवघ्या २३ किलो ‘आरडीएक्स’चा वापर करण्यात आला होता. या आरडीएक्समुळे मुंबईत रक्ताचे पाट वाहिले होते.शेकडो जणांचा बळी गेला होता. अनेक जण जायबंदी झाले. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेचिराख झाली होती. अवघ्या २३ किलो आरडीएक्सने तेव्हा हाहाकार माजविला होता.इकडे ९ ते १४ मे २००६ या कालावधीत वेरूळ व परिसरात अतिरेक्यांकडून जप्त करण्यात आलेले आरडीएक्स तब्बल ४३ किलो होते. शिवाय १४ एके-४७, हजारो काडतुसे, ५० हातबॉम्ब होते. हे अतिरेकी आणि शस्त्रसाठा पकडल्या गेला नसता तर राज्यात मोठा अनर्थ घडला असता. या ४३ किलो आरडीएक्समध्ये औरंगाबादसारखी एक- दोन शहरे सहजच बेचिराख झाली असती. एटीएस, स्थानिक पोलिसांच्या कामगिरीमुळे राज्यावरील एक मोठे बालंट टळले.अतिरेक्यांच्या शोधासाठी मोठी मोहीमवेरूळमध्ये घृष्णेश्वर मंदिरासमोर सुमो सोडून अंधारात पळालेल्या तीन अतिरेक्यांच्या शोधासाठी मोठी शोधमोहीम राबविण्यात आली. तेव्हा वेरूळजवळच मोहंमद आमेर (रा. औरंगाबाद) हा अतिरेकी एटीएसच्या हाती लागला. मुजफ्फर अहेमद व अब्दुल शकील या दोघांना औरंगाबाद शहराजवळ अटक करण्यात आली. घृष्णेश्वर मंदिराजवळ अतिरेक्यांनी सोडलेल्या सुमोमध्ये त्यांच्या जीपमध्ये तब्बल ३३ किलो आरडीएक्स, ११ एके-४७ व २५०० काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा सापडला. त्यानंतर एटीएसने स्फोटकाने भरलेल्या बेपत्ता झालेल्या दोन्ही कारचा शोध सुरू केला. १२ मे रोजी येवला परिसरातील अंकाईच्या डोंगरात एटीएसला स्फोटकांनी भरलेली अतिरेक्यांची आणखी एक कार सापडली. त्यातही १० किलो आरडीएक्स, ५० हातबॉम्ब, १ एक-४७ व शेकडो काडतुस असा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. मग एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापे मारून एकापाठोपाठ या प्रकरणात औरंगाबाद, बीड येथील एकूण २२ अतिरेक्यांना अटक केली होती. त्यातील काही अतिरेकी बांगला देशमार्गे पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत होते. त्यांना बांगला देशच्या सीमेवर अटक करण्यात आली होती. एक कार अद्यापही गायबया अतिरेक्यांनी दोन कार आणि एक जीप भरून आरडीएक्स, एके- ४७, काडतुसे असा शस्त्रसाठा आणलेला होता. त्यातील दोन वाहने एटीएसच्या हाती लागली. तिसरे वाहन अद्याप सापडलेले नाही, हे विशेष. त्यातही स्फोटके आणि शस्त्रांचा मोठा साठा होता. विशेष म्हणजे बेपत्ता कारमध्ये या शस्त्रसाठ्याचा मास्टर मार्इंट असलेल्या कुख्यात अतिरेकी जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू ्रजुंदाल होता, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.मा स्ट र मा र्इं ड अबू जुंदाल आणि फय्याज कागझीया शस्त्रसाठ्याचे मास्टरमार्इंड बीड येथील जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल व फय्याज कागझी असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले होते. हे दोघेही औरंगाबादेतून एटीएसच्या ताब्यातून निसटल्यानंतर बांगलादेश मार्गे पाकिस्तानात पसार झाले होते. २०१२ मध्ये अखेर सौदी अरेबियात अबू जुंदाल पकडल्या गेला. तेथून प्रत्यार्पण करून त्याला महाराष्ट्रात आणण्यात आले. फय्याज कागझीसह चौघे फरार; नईमने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरीया शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमार्इंड असलेला बीडचा फय्याज कागझी अद्याप हाती लागलेला नाही. त्याच्यासह या प्रकरणातील नईम ऊर्फ नम्मू (रा. औरंगाबाद), एजाज शेख, मसूद शेख (बीड) हे फरार आहेत. ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा अंदाज गुप्तचर विभागाचा आहे. त्यांना फरार घोषित करून ‘लूक आऊट’ नोटीसही जारी करण्यात आलेल्या आहेत. आरोपी नईम याला एटीएसने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. तपासासाठी त्याला पश्चिम बंगाल येथे नेले. त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. अद्याप तो सापडलेला नाही.वेरूळ प्रकरणामुळे ‘एटीएस’चा विस्तार२००६ पर्यंत राज्यात एटीएस (दहशतवादविरोधी पथक)ची केवळ एकच शाखा होती. मुंबईतील एटीएसचे पथकच राज्यभरातील कारवाईवर लक्ष ठेवायचे; परंतु वेरूळ प्रकरणानंतर अतिरेक्यांची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले अन् एटीएसचा विस्तार करणे गरजेचे आहे, याची गृहखात्याला जाण आली. त्यानंतरच प्रत्येक जिल्ह्यात दहशतवादविरोधी सेल (एटीसी)ची स्थापना करण्यात आली.शिवाय औरंगाबाद, नांदेड, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी पथके कार्यान्वित करण्यात आली.एटीएसच्या या विस्तारामुळे अतिरेकी कारवायांचा बीमोड करण्यास मोठी मदत होत आहे, हे विशेष.