शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही मराठवाड्याला सुजलाम् सुफलाम् करणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 12:21 IST

गेल्या तीन वर्षात सरकारने मराठवाड्यात विशेष लक्ष दिलं आहे. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेत मराठवाड्यातील 40 लाख लोकांना लाभ मिळाला..

औरंगाबाद, दि. 17 :  गेल्या तीन वर्षात सरकारने मराठवाड्यात विशेष लक्ष दिलं आहे. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेत मराठवाड्यातील 40 लाख लोकांना लाभ मिळाला, सिंचानाचा प्रश्न सोडवण्यासाठी धरणांची कामे केली तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून साडेचार लाख हेक्टर शेतीला पाणी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी राज्य सरकारने योग्य ते नियोजन केलं आहे. यासाठी दमणगंगा-पिंजाळच्या माध्यमातून मराठवाड्याला 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे. यासाठी मान्यता दिली असून लवकरच एमओयूच्या माध्यमातून केंद्राकडे योजना जाईल व त्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजूर होईल. आम्ही मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभाच्या प्रांगणात झालेल्‍या या कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. मुक्ती संग्रामातील शहिदांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले.भारतमाता 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाली. पण भारतमातेचे काही पूत्र मात्र पारतंत्र्यात होते. त्यापैकी एक मराठवाडा. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देणे त्याकाळात मोठे आव्हान होते. मराठवाड्यातील वीरांनी मोठा संघर्ष केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. थोर वीरांमुळेच आज आपण स्वतंत्र अनुभवतो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.