शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आम्हालाही न्याय हवाय... पीडित पुरुषांची मागणी

By admin | Updated: May 15, 2017 06:47 IST

नवरा काय तर फिरायलाच नेत नाही... तो माझे ऐकतच नाही... मला तुझ्या आईवडिलांबरोबर राहायचे नाही...

नम्रता फडणीस। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नवरा काय तर फिरायलाच नेत नाही... तो माझे ऐकतच नाही... मला तुझ्या आईवडिलांबरोबर राहायचे नाही... आपण वेगळे राहू...अशा अनेक छोट्या-मोठ्या कुरबुरी सगळ्याच घरात ऐकायला मिळतात, मात्र काही महिला हे वाद इतके विकोपाला नेतात की कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत सरळ तक्रारी करून पतीसह त्याच्या कुटुंबीयांना न्यायालयात खेचतात. समाजात महिलांच्या त्रासाला बळी पडणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांचेही म्हणणे पोलिसांनी ऐकून घ्यायला हवे, या त्यांच्या म्हणण्याकडेही दुर्लक्ष केलं जातेयं; म्हणून आता पुरुषांना हवाय महिलांप्रमाणेच स्वतंत्र कायदा! चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. काही दिवसांपूर्वी पुण्यात किरण पाटील या एका उच्चशिक्षिताने आपल्या मुलीसह आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, त्यांच्या पत्नीने देखील त्यांच्यासह कुटुंबीयांविरूद्ध न्यायालयात केस दाखल केली होती़ मागील महिन्यात सलील नाईक यानेही याच कारणास्तव आत्महत्येला जवळ केले. खरंच त्यांचे काय चुकले होते? आज समाजात असे अनेक पुरुष आहेत जे पत्नीने कौटुंबीक हिंसाचार कायद्यांतर्गत केलेल्या खोट्या तक्रारींचे शिकार ठरलेले आहेत. त्यामुळे पत्नीकडून पुरुषांच्या केलेल्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.वाढदिवसाला नवऱ्याने बायकोला फोन केला नाही, तिच्या मनासारखे तो वागत नाही, मग चढा पोलिसांची पायरी. या गोष्टींमुळे पत्नीकडून पतीला विनाकारण त्रास दिला जात आहे. मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे समुपदेशकांकडे किंवा कोर्टातही पुरुष आसवांना वाट मोकळी करून देतो. शेवटी आत्महत्येशिवाय त्यांना गत्यंतर उरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुरुषांचीही एक बाजू असते ती पोलिसांनी ऐकून घेतली पाहिजे. सगळेच पुरुष सारखे नसतात, याकडे पुरुष हक्क संरक्षण समितीने लक्ष वेधले आहे.