शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

आम्ही रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण, पंचगंगा स्मशानभूमीतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 10:25 IST

: कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाला खांदा तर दूरच, त्याच्या जवळही जाण्यास नातेवाईक धजावत नसताना, थेट कोरोनाशी सामना करीत पंचगंगा स्मशानभूमीतील २० कर्मचारी रोज अशा मृतदेहांवर अग्निसंस्कार करत आहेत. मृतदेहाला हाताळणे म्हणजे साक्षात मरणालाच आमंत्रण देण्यासारखे. मात्र आपले पहिले कर्तव्य म्हणून या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत २६०, तर गेल्या चार दिवसांत ८५ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पुरेशी दक्षता घेतल्याने त्यापैकी आजअखेर एकही कोरोनाबाधित झालेला नाही, ही चांगली बाब आहे.

ठळक मुद्देआम्ही रोज पाहतो मरण, तरीही रचतो सरण, पंचगंगा स्मशानभूमीतील चित्र दक्षता घेऊन कर्मचाऱ्यांनी रोखला कोरोना : तीन पाळीत २४ तास काम

सचिन भोसलेकोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाला खांदा तर दूरच, त्याच्या जवळही जाण्यास नातेवाईक धजावत नसताना, थेट कोरोनाशी सामना करीत पंचगंगा स्मशानभूमीतील २० कर्मचारी रोज अशा मृतदेहांवर अग्निसंस्कार करत आहेत. मृतदेहाला हाताळणे म्हणजे साक्षात मरणालाच आमंत्रण देण्यासारखे. मात्र आपले पहिले कर्तव्य म्हणून या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत २६०, तर गेल्या चार दिवसांत ८५ कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पुरेशी दक्षता घेतल्याने त्यापैकी आजअखेर एकही कोरोनाबाधित झालेला नाही, ही चांगली बाब आहे.गेल्या दोन महिन्यांत २६० कोरोनाग्रस्त मृतांवर पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी अग्निसंस्कार केले आहेत. गेल्या चार दिवसांत तर मोठी भयाण स्थिती येथे आहे. तीन पाळीत ८ - ८ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकूण ८५ कोरोनाग्रस्तांवर, तर इतर व्याधींनी मृत झालेले २५, अशा एकूण ११० जणांवर अंत्यसंस्कार केले. प्रत्येक कर्मचारी पीपीई कीट घालून, सॅनिटायझरचा वापर करून हे कार्य करीत आहे.

अनेकांच्या अंत्यसंस्काराला एक, दोन अथवा काहीवेळेला कोणच नसते. अशावेळी त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक होऊन तो मृतदेह हाताळणे आणि सर्व सोपस्कारही येथील कर्मचारी करतात. दुसऱ्यादिवशी रक्षाही ते विसर्जित करतात. कोरोना मृतावर एक मण लाकूड व साडेचारशे शेणी हे कर्मचारी रचतात.

त्यानंतर स्वत:च कापूर घेऊन त्यावर आपलाच नातेवाईक असल्याप्रमाणे मृतदेहाला संसारी मोहातून सुटका मिळावी, म्हणून हराटी मंत्र म्हणून अग्निसंस्कार करतात. ऐन उन्हाळ्यात कोरोना संसर्गाने मृत होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एकाबाजूने सरणाच्या आगीच्या ज्वाळा आणि वरून उन्हाच्या तीव्र झळा सोसून हे कर्मचारी इमाने इतबारे सेवा बजावत आहेत.अशी घेतली जाते दक्षताकोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पीपीई कीट, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार केल्यामुळे एकाही कर्मचाऱ्याला अद्यापही कोरोना संसर्ग झालेला नाही. एक कोरोनाग्रस्त मृतदेह आल्यानंतर पूर्णपणे प्लास्टिकने मृतदेह झाकलेला असतो. तरीसुद्धा काळजीपोटी कर्मचारी पीपीई कीट घालूनच तो मृतदेह रचलेल्या सरणावर ठेवतात. त्यानंतर शेणी, कापूर लावून दहन करतात. दहन झाल्यानंतर सॅनिटायझरने सर्व शरीराची स्वच्छता करतात. प्रत्येकास एन-९५ मास्क सक्तीचा आहे.हे आहेत बहाद्दर कोरोना योद्धे...अरविंद कांबळे (आरोग्य निरीक्षक), बाबासाहेब भोसले, सुनील कांबळे, तुळशीदास कांबळे, प्रदीप बानगे, अनिल चौगले, विलास कांबळे, करण बानगे, विल्सन दाभाडे, हिंदुराव सातपुते, अशोक गवळी, रवी कांबळे, जयदीप कांबळे, वैभव लिगडे, प्रसाद सरनाईक, अमोल कांबळे, आशिष बानगे, राजू कांबळे यांचा समावेश आहे.दृष्टिक्षेप...

  • एकूण दहन बेडची संख्या - ४७
  • कोरोना मृतांसाठी राखीव - २७ बेड
  • नॉनकोविड मृतांसाठी राखीव - २०
  • कर्मचारी संख्या - २०
  • कामाच्या वेळा : २४ तास
  • गॅसदाहिनी - १
  • दोन महिन्यात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार - २६०
  • गेल्या चार दिवसांत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार - ८५

पीपीई कीट, सॅनिटायझरचा पुरेपूर वापर करून कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करतात. धोका असला, तरी हे काम कर्मचारी अव्याहतपणे करत आहेत.- अरविंद कांबळे,आरोग्य निरीक्षक

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर