शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शंभर वर्षे शिकत आलो, कुणाला शिकवायला कधी गेलो नाही; बाबासाहेब पुरंदरे यांचे मनोगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 08:41 IST

आयुष्यात मिळालेले आई-वडिल आणि शिक्षकांचे संस्कार कधीही विसरणार नाही

ठळक मुद्देस्पाँडिलायसिसचा त्रास जाणवू लागल्यामुळे ते पडूनच होते.कुणालाही निराश न करता प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करीत उत्साहाने सर्वांना सामोरे जाणारे बाबासाहेब बोलताना काहीसे हळवे झालेमला अधिक बोलता येत नाहीये त्याबद्दल माफ करा... हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

पुणे : ‘शंभरावं वर्ष लागतंय... कदाचित विधात्याची ही इच्छा असावी. या काळात मी खूप शिकलो. शिकविण्याचा आव मी कधी आणला नाही...’, शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते.

शंभरावं वर्ष लागतंय. पण मी खरंतर वेगळं असं काही केलं नाही. मला कसलंही व्यसन नाही इतकंच. आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही. अजून दोन ते तीन वर्षे मिळाली तर इतकंच मागतो की मला आजारी पडू देऊ नकोस. पुढील आयुष्य मिळालं तर छान हसत-खेळत स्वावलंबी असावं.... अशी भावना बाबासाहेब यांनी व्यक्त केली.

कोथरूड येथे मुलाच्या घरी बाबासाहेब वास्तव्यास आहेत. वयाची ८० वर्षे शिवचरित्राचा ध्यास घेत तब्बल ५ लाख किलोमीटरचा प्रवास, राजाशिवछत्रपती ग्रंथाच्या १७ आवृत्या, जगभरात २५ हजार व्याख्याने असा थक्क करणारा प्रवास करीत हे शिवशाहीर गुरूवारी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी संवाद साधला.  स्पाँडिलायसिसचा त्रास जाणवू लागल्यामुळे ते पडूनच होते. कुणालाही निराश न करता प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करीत उत्साहाने सर्वांना सामोरे जाणारे बाबासाहेब बोलताना काहीसे हळवे झाले. मला अधिक बोलता येत नाहीये त्याबद्दल माफ करा... हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. १९४० साली सायकलवरून पडल्यानंतर त्यांना स्पाँडिलायसिसचा त्रास सुरू झाला.

आयुष्यात मिळालेले आई-वडिल आणि शिक्षकांचे संस्कार कधीही विसरणार नाही. वडिलांचं नेहमी सांगणं होतं की, ‘माणसानं नेहमी समजून वागावं’. ती समजूत आपलीच आपल्याला घ्यायची आहे. ती कुणी आयती आणून देणार नाही. जे शिकवतात ते गुरू. ते जे शिकवतात ते मनापासून शिकलं पाहिजे. आईवडिलांबद्दल आदरभावना ठेवली पाहिजे. जे आपल्यासाठी इतकं करतात त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो. आईवडिलांशी फक्त गोड बोला ते तुम्हाला उदंड आशीर्वाद देतील. कोणाचाही अपमान, द्वेष करू नका असं वडिलांनी शिकवलं. त्यांनी दिलेली शिकवण कधीही विसरलो नाही... बाबासाहेब सांगत होते. शिवशाहरी शंभरीत पदार्पण करीत असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे. पण समाधानी आणि तृप्त नाही. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहायची इच्छा आहे. सर्वांना रायगडावर घेऊन जायचे आहे.’’ - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.

 

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे