शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा मार्ग सुकर

By admin | Updated: July 20, 2014 00:00 IST

मतदारसंघातील सहा आजी आणि दोन माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने आता या मतदारसंघातील शिवसेनेचा मार्ग आणखीनच सुकर झाला आहे.

ठाणो : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून रवींद्र फाटक यांचे नाव आघाडीवर असताना आता त्यांनीच या मतदारसंघातील सहा आजी आणि दोन माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने आता या मतदारसंघातील शिवसेनेचा मार्ग आणखीनच सुकर झाला आहे. 
कोपरी-पाचपाखाडी हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी मागील निवडणुकीचा विचार करता येथे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना 73 हजार 5क्2 मते मिळाली होती. दुस:या क्रमांकाची 4क् हजार 726 मते काँग्रेसचे मनोज शिंदे यांना मिळाली होती. तिस:या क्रमांकावर मनसेचे राजन गावंड होते. त्यांना 35 हजार 914 मते मिळाली होती. दरम्यान, मनोज शिंदे हे सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांच्या जागी काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक यांचा क्रमांक लागला होता. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू होती. विशेष म्हणजे ते स्थायी समिती सभापती झाल्यानंतर त्यांनी याच मतदारसंघावर अधिक भर देऊन अनेक विकासाची कामे मंजूर करून घेतली होती. तसेच अनेक समस्या जाणून घेऊन या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि रवींद्र फाटक यांच्यात कांटे की टक्कर होणार, हे निश्चित मानले जात होते. 
परंतु, मागील महिन्यापासून उद्योगमंत्री नारायण राणो यांनी नाराजी व्यक्त करून काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्या. राणो यांच्या निर्णयाने फाटकसुद्धा नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेची कास धरण्याचा प्रयत्न सुरू केला. एक महिन्यापासून त्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर, शनिवारी त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे फाटक हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात होते. तसेच त्यांच्यासोबत असलेले नगरसेवक दीपक वेतकर, मीनल संखे, कांचन चिंदरकर, मनजित कौर, माजी नगरसेवक शैलेश सावंत आणि मधुकर होडावडेकर हेसुद्धा याच मतदारसंघातील असल्याने आता त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने येथील काँग्रेसच्या मतांत फार मोठय़ा प्रमाणात फरक पडणार आहे. सध्या येथे आता एकही तुल्यबळ असा उमेदवार काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडे नाही. एकूणच तुल्यबळ ठरणा:या या मतदारसंघात आता एकतर्फी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
कुडाळमधून राणोंच्याच विरोधात लढणार ?
नारायण राणो यांचे खंदे समर्थक समजले जाणारे फाटक यांचे आमदारकीचे स्वप्न काँग्रेसमध्ये पूर्ण होऊ न शकल्याने त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. ठाण्यातून उमेदवारी सध्या शक्य नसल्याचे दिसत असल्याने त्यांनी कुडाळमधून राणोंच्याच विरोधात निवडणूक लढवल्यास शिवसेना पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करेल, असे त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रंनी दिली.
 
दुसरीकडे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर लढण्यासाठीचा कानमंत्रदेखील ठाण्यातील एका आमदाराने दिला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
त्यातही ठाण्यातून त्यांना उमेदवारी दिल्यास अनंत तरे, नरेश म्हस्के यांच्यासारख्या शिवसेनेतील अनेक नाराजांचा फटका त्यांना सहन करावा लागण्याची चिन्हेसुद्धा आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडू शकते, असा कयासही लावला जात आहे.