शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशासाठी पाहावी लागणार जुलैची वाट

By admin | Updated: June 21, 2016 00:46 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच गणवेश मिळणे अपेक्षित असताना यंदा गणवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलैची वाट पाहावी लागणार

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच गणवेश मिळणे अपेक्षित असताना यंदा गणवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जुलैची वाट पाहावी लागणार आहे. निविदा प्रक्रियेतील ठेकेदाराने न्यायालयामध्ये धाव घेतल्याने गणवेश मिळण्यास उशीर झाल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शहरामध्ये महापालिका शिक्षण मंडळाच्या ३१० शाळा असून, त्यामध्ये ९० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये प्रामुख्याने कष्टकरी, मजूर तसेच अल्प उत्पन्न गटातील मुले-मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा ते कुठेही कमी राहू नये याकरिता शिक्षण मंडळाकडून या विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, रेनकोट, स्वेटर दप्तर, वह्या, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. मात्र अनेकदा साहित्य वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा याकरिता शिक्षण मंडळाने खूप अगोदर निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्याने निविदा प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे गणवेशाची वर्क आॅर्डर निघण्यास उशीर झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात शिक्षण मंडळाकडून मफतलाल यांना गणवेशाची वर्क आॅर्डर देण्यात आली आहे. शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ९० हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा करायचा असल्याने त्यासाठी ठेकेदाराने १ जुलैपर्यंतची मुदत शिक्षण मंडळाकडे मागितली आहे. वर्क आॅर्डर एक महिन्यापूर्वी मिळाली असती तर ठेकेदाराला गणवेशाचा वेळेत पुरवठा करणे शक्य झाले असते. सध्या १५ हजार गणवेश ठेकेदाराकडून शिक्षण मंडळाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित गणवेश जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरविले जाणार आहेत. वह्या, पुस्तके, बूट, दप्तर आदी इतर साहित्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर गणवेशही लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत, याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण मंडळाकडून शैक्षणिक साहित्याची केली जाणारी खरेदी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आली आहे. सततच्या वादामुळे शिक्षण मंडळाचे सर्व अधिकार काढून घेण्याची कारवाई राज्य शासनाकडून केली गेली होती. मागील वेळेस स्वेटर खरेदीमध्ये अनियिमितता आढळून आल्याने आयुक्तांनी शिक्षणप्रमुखांना कार्यमुक्त केले, तर इतर ४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली होती. (प्रतिनिधी)1महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना रेनकोट पुरविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील सर्व ठेकेदारांचे रेनकोट चाचणीमध्ये फेल ठरले आहेत. त्यामुळे तातडीने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. मात्र, पावसाळा सुरू झाला असताना रेनकोट मिळण्यास आणखी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.2वह्या, पुस्तके, बूट, दप्तर आदी इतर साहित्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे़गणवेश लवकर देण्यासाठी प्रयत्न सुरूनिविदा प्रक्रियेतील ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाची वर्क आॅर्डर देण्यास उशीर झाला. पंधरा दिवसांपूर्वी ही वर्क आॅर्डर काढण्यात आली आहे. सध्या १५ हजार विद्यार्थ्यांचे गणवेश प्राप्त झाले असून, उर्वरित गणवेश १ जुलैपर्यंत मिळणार आहेत. इतर साहित्य वह्या, पुस्तके, दप्तर, बूट यांचे विद्यार्थ्यांना वाटप केले जात आहे.- वासंती काकडे, अध्यक्षा, शिक्षण मंडळ