शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राखीव साठ्यातून पाणी उचलणे लवकरच थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:55 IST

धरण क्षेत्रांत पावसाची दमदार हजेरी; पाणीपातळी १३ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत धरणांतील पाण्याची पातळी १३ टक्के झाली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद होणे अपेक्षित आहे. याबाबत महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा उचलण्यास १० जूनपासून सुरुवात केली होती. 

यंदा मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी साधारणपणे ७ जूननंतर पावसाला सुरुवात होते. मे महिन्यात फक्त मुंबईच नव्हे, तर धरण क्षेत्रांतही पाऊस झाला. आताही जूनमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. एरवी जुलैमध्ये भरणारा पवई तलावही यंदा जूनमध्ये वाहू लागला आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढत असून, त्यात आणखी काही टक्के वाढ झाली तर राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद केले जाईल, असे सांगण्यात आले.

...तर धरणेही आधीच भरण्याची शक्यता धरणांतील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेल्यास राखीव साठ्यातून पाणी उचलले जाते. मात्र, पावसाला आता सुरुवात झाली आहे. अजून पावसाचे चार महिने शिल्लक आहेत. पाऊस दमदार झाला तर यंदा सर्व धरणे अपेक्षेपेक्षा आधीच भरण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसांमध्ये धरण क्षेत्रांत किती पाऊस होत आहे, पाण्याच्या पातळीत किती वाढ होत आहे, याचा अंदाज घेऊन राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. 

एक लाख ९० हजार दशलक्ष लिटर साठा पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत मिळून पाणीसाठा जवळपास १३ टक्के एवढा झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण फक्त पाच टक्के होते. या सर्व धरणांमध्ये मिळून एक लाख ९०  हजार ७४१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ७७ हजार ४४० दशलक्ष लिटर एवढे होते. 

टॅग्स :Mumbaiमुंबई