शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

‘उल्हास’चा पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: June 29, 2016 02:50 IST

जिल्ह्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनदीत बऱ्यापैकी पाणी साठा निर्माण झाला आहे.

सुरेश लोखंडे,

ठाणे- जिल्ह्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उल्हासनदीत बऱ्यापैकी पाणी साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी आदी शहरांचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.या शहराना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात अद्याप १८०.०३ पैकी केवळ १६.३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे, तर उल्हासनदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात ३३९.१४ पैकी फक्त १९.०६ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. धरणांमधील या अल्प पाणी साठ्यामधून शहरांना सुरळीत पाणीपुरवठा करणेच शक्य नाही. पण या धरणांच्या खाली असलेल्या नदी, नाल्याचे पाणी उल्हासदीसह मोहने बंधारा, जांभूळ आदी बंधाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी साठलेले असल्यामुळे त्याचा रोजच्या पाणी पुरवठ्यासाठी वापर केला जात आहे.पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणांऐवजी उल्हासनदी खोऱ्यात व माळशेज घाटात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. या परिसरातील पावसाचे पाणी उल्हासनदीच्या उपनद्या, नाल्यांव्दारे आल्यामुळे उल्हासनदीच्या पात्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वाहून जाणाऱ्या या पाण्याचा वापर टेमघर व एमआयडीसीकडून दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी केला जात आहे. यामुळे सध्या तरी या यंत्रणांकडून ठिकठिकाणच्या शहरांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. आठवड्यातून पाच दिवस पाणीपुरवठा बंद न करता ती कपात टप्प्याटप्प्याने मागे घेतली जात आहे. >मध्य रेल्वे वेळेत : गेले दोन दिवस कोलमडलेले मध्य रेल्वेचे वेळापत्रक मंगळवारी मात्र दिवसभर सुरळीत होते. कर्जतसह कसारा मार्गावरील सीएसटीला जाणाऱ्या सर्व लोकल वेळेनुसार धावत होत्या. सकाळच्या पहिल्या सत्रात १० मिनिटे विलंबाने धावणाऱ्या लोकल दुपारनंतर वेळेवर धावल्या. त्यामुळे लाखो चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात फारसा त्रास झाला नाही. संध्याकाळच्या तिसऱ्या सत्रात लोकल वेळेत धावल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण होते. >भातसातील २५ एमएलडी पाण्यावरून मीरा-भाईंदर व ठाणे महापालिकेत संघर्षभार्इंदर - मीरा-भार्इंदर शहराला भातसा धरणातील २५ एमएलडी पाणी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठाणे शहराच्या कोट्यातून मागितलेले पाणी देण्यास ठाणे महापालिकेने विरोध केला असल्याने मीरा-भार्इंदर व ठाणे महापालिकेत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. शहराला स्टेम व एमआयडीसीकडून दररोज मिळणारा पाणीपुरवठा प्रत्येकी ८६ व ५० एमएलडी इतका आहे. यातील एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सध्या १० एमएलडी कपात लागू आहे. ही कपात स्टेमकडून भरून काढली जात आहे. ठाणे महापालिकेच्या कोट्यातून अतिरिक्त १५ एमएलडी पाणीसुद्धा स्टेममार्फतच देण्यात येत आहे. मात्र ही तात्पुरती सोय असून पुरेशा पावसानंतर हा अतिरिक्त पाणीपुरवठा खंडीत होणार आहे.अलीकडेच भातसा धरणातून ठाणे पालिकेला मिळालेल्या ५० एमएलडी पाण्यापैकी ५ एमएलडी पाणी मीरा-भार्इंदरला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी शहराला मुंबई महापालिकेकडून मिळणारे ५ एमएलडी पाणी गेल्या २ वर्षांपासून बंद आहे. ते पुन्हा सुरु करण्यासाठी प्रशासन मुंबई महापालिकेकडे सतत पाठपुरावा करीत आहे. बारवीतून पावसाळ््यात विसर्ग होणारे पाणी मीरा-भार्इंदरला वळते करण्याचा ठराव दोन वर्षापूर्वीच्या महासभेत मंजूर झाला होता.२००९ मध्ये शहराला सूर्या धरणातून ११८ व राज्य शासनाने मंजूर केलेले १०० अशी एकूण २१८ एमएलडी पाणीपुरवठा योजना एमएमआरडीएमार्फत राबविण्यात येत आहे. ती वनविभागाच्या लालफितशाही कारभारात अडकली आहे.शहराला शासनानेच मंजूर केलेल्या अतिरिक्त पाणीपुरवठ्यातून ७५ एमएलडी पाणी देण्यास एमआयडीसीने मान्यता दिल्याने त्याचे काम सध्या सुरु आहे. हे पाणी शहराला मिळण्यास दोन वर्षे लागणार आहे. त्यातच मौजे पिसे बंधाऱ्यातून २५ एमएलडी पाणी मिळावे, असा प्रस्ताव सादर केला.हा ठराव भाजपाचे गटनेते शरद पाटील यांनी मांडला असता त्याला सर्वानुमते मान्यता मिळाली. हा पाणीपुरवठा ठाणे पालिकेच्या कोट्यातून मिळणे अपेक्षित आहे मात्र ते देण्यास ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेसह शासनाचेच उंबरठे झिजवावे लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे पाणी समस्येला काहीअंशी पूर्णविराम मिळाला आहे. ठाण्यासह, मीरा-भार्इंदर, भिवंडीला पाणीपुरवठा करणाऱ्या शहाड-टेमघर यंत्रणेकडून वाहून जाणारे २९६ एमएलडी पाणी दररोज उचलण्यात येत आहे.या आधी त्यांच्याकडून केवळ २६० एमएलडी पाणी उचलण्यात येत होते. एमआयडीसी देखील ही पध्दत वापरत असल्यामुळे त्यांच्याकडून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरसह परिसरातील गावाना आता दररोज पाणीपुरवठा केला जात आहे.