शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नसलेल्या ग्रा.पं.साठी पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: June 9, 2017 02:47 IST

उपअभियंता आर.एस.माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील उमटे धरणामधील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतानाच अलिबागच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एस.माळी यांनी अस्तित्वात नसलेल्या कावाडे ग्रामपंचायतीच्या नावे एकाच कामाची दोन अंदाजपत्रके तयार केली. सरकारी निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे आपले पोर्टलवरून दिली आहे.ग्रामस्थ मच्छिंद्र पाटील यांनीही याबाबत आधी तक्रार केली होती. त्यावर काहीच कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी आर.एस.माळी यांच्याविरुध्द मधुकर ठाकूर यांनी २१ सप्टेंबर २०१६ रोजी तक्र ार करून त्यांचा पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार तत्काळ काढून घ्यावा, अशी मागणी केली होती. परंतु जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ठाकूर यांना १९ डिसेंबर २०१६ रोजी पत्र लिहून रिक्त पदे भरल्यावर माळी यांचा कार्यभार काढून घेण्यात येईल असे कळविले होते. याच माळी यांचे उमटे धरणामधील कंत्राटदाराला कामे न करता ३ कोटी रुपयांचे बिल अदा करणे, अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतींच्या नावे बिले काढणे असे पराक्र म उघडकीस आले आहेत. दीड वर्षापूर्वी तर मापगाव पाणीपुरवठा योजनेमध्ये बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल माळी यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. असे असतानाही खोटी बिले काढून विविध पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची पोटे भरण्यासाठी माळी यांना या ठिकाणी कार्यरत ठेवल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. त्यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार काढून न घेण्यास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारीही जबाबदार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.कावाडे येथील शौचालयासाठी पाण्याची लाइन टाकणे, टाकी बांधणे अशा कामांसाठी अलिबाग उपविभागाने ग्रामपंचायत कावाडे जी ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही तिच्या नावे प्रभारी उप अभियंता माळी यांनी पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्याचेही प्रमाणपत्र दिले आहे. >पत्र लिहिलेली ग्रामपंचायत अस्तित्वातच नाहीबिल शेकापच्या माजी सभापती असणाऱ्या मुलाच्या नावे असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. कावाडे येथील पाणीपुरवठा योजनेबाबतच्या या पत्रावर जावक क्र मांक नाही, तारीख नाही, पत्र लिहिलेली ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही. या सर्व प्रकारावरून पाणीपुरवठा विभागाचा कारभार कसा अनागोंदी चालला आहे हे सिध्द होते. कावाडे येथील शौचालयासाठी पाण्याची लाइन टाकणे, टाकी बांधणे अशा कामांसाठी अलिबाग उपविभागाने ग्रामपंचायत कावाडे जी ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही तिच्या नावे प्रभारी उप अभियंता माळी यांनी पत्र दिले.