शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

बारामतीत ५५ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 20, 2016 02:22 IST

इंदापूर तालुक्यात २१ अशा एकूण ५५ टँकरनी दोन्ही तालुक्यातील मिळून एकूण १ लाख २६ हजार ५३९ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे

बारामती : बारामती उपविभागातील बारामती तालुक्यात ३४, तर इंदापूर तालुक्यात २१ अशा एकूण ५५ टँकरनी दोन्ही तालुक्यातील मिळून एकूण १ लाख २६ हजार ५३९ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील २२ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना, तर इंदापूर तालुक्यातील १८ गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या ४७ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसत आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी, काळखैरेवाडी, देऊळगाव रसाळ, जळगाव सुपे, पानसरेवाडी, कारखेल, जराडवाडी, खराडेवाडी, कोळोली, उंडवडी सुपे, उंडवडी क.प., मोराळवाडी, वाकी, कुतवळवाडी, दंडवाडी, साबळेवाडी, निंबोडी, कटफळ, सोनवडी सुपे, गोजुबावी, भोंडवेवाडी, आंबी खुर्द, नारोळी, अंजनगाव, सायबाचीवाडी, भिलारवाडी, वाढाणे, तरडोली, मासाळवाडी, लोणीभापकर, शिर्सुफळ, काऱ्हाटी, मुर्टी, मुढाळे, गाडीखेल, मोढवे, मोरगाव, पारवडी, जैनकवाडी, सावळ या गावांसह त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या २५५ वाड्या-वस्त्यांना ३४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावातील एकूण लोकसंख्या ७० हजार ४२२ इतकी आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब, वडापुरी, गलांडवाडी-२, विठ्ठलवाडी, गोखळी, झगडेवाडी, खोरोची, वकीलवस्ती, भोडणी, कौटळी, शेटफळगढे, रुई, कळस, व्याहाळी, दगडवाडी, घोरपडवस्ती, कचरवाडी नि.के., कडबनवाडी, निरगुडे, वायसेवाडी, अकोले या गावांसह या गावांशी संलग्न असणाऱ्या ४७ वाड्या-वस्त्यांना २१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईच्या गावांतील एकूण लोकसंख्या ५६ हजार ११७ इतकी असून, येथील ९ खासगी, तर २ शासकीय बोअर अधिग्रहण केल्या आहेत. तरंगवाडी तलावात पाण्यामुळे दिलासादरम्यान, इंदापूर व बारामती तालुक्यातील टंचाईची भीषण स्थिती लक्षात घेऊन शासनाने खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्यासाठी तरंगवाडी तलावात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडले आहे. तर बारामती तालुक्यासाठी सुपा तलावात पाणी सोडण्यात आले आहे. ऐन टंचाईच्या काळात हे पाणी सोडण्यात आल्याने या तलावावर अवलंबून असणाऱ्या जनेतला दिलासा मिळाला आहे.